quranm◉

Surah Al-Isra transliteration

◉ सूरह · ∞

17:1

سُبۡحَٰنَ ٱلَّذِيٓ أَسۡرَىٰ بِعَبۡدِهِۦ لَيۡلٗا مِّنَ ٱلۡمَسۡجِدِ ٱلۡحَرَامِ إِلَى ٱلۡمَسۡجِدِ ٱلۡأَقۡصَا ٱلَّذِي بَٰرَكۡنَا حَوۡلَهُۥ لِنُرِيَهُۥ مِنۡ ءَايَٰتِنَآۚ إِنَّهُۥ هُوَ ٱلسَّمِيعُ ٱلۡبَصِيرُ ﴿1﴾

Transliteration: Subhana allathee asra biAAabdihi laylan mina almasjidi alharami ila almasjidi alaqsa allathee barakna hawlahu linuriyahu min ayatina innahu huwa alssameeAAu albaseeru

Translation: १. पवित्र आहे तो (अल्लाह), जो आपल्या दासाला एका रात्रीतून आदरणीय मस्जिदीपासून, अक्सा मस्जिदपर्यंत घेऊन गेला, जिच्या भोवती आम्ही बरकती प्रदान करून ठेवल्या आहेत. यासाठी की आम्ही त्याला आपल्या सामर्थ्याच्या काही मोठ्या निशाण्या दाखवून द्याव्यात. निःसंशय सर्वश्रेष्ठ अल्लाहच चांगल्या प्रकारे ऐकणारा, पाहणारा आहे.

17:2

وَءَاتَيۡنَا مُوسَى ٱلۡكِتَٰبَ وَجَعَلۡنَٰهُ هُدٗى لِّبَنِيٓ إِسۡرَـٰٓءِيلَ أَلَّا تَتَّخِذُواْ مِن دُونِي وَكِيلٗا ﴿2﴾

Transliteration: Waatayna moosa alkitaba wajaAAalnahu hudan libanee israeela alla tattakhithoo min doonee wakeelan

Translation: २. आणि आम्ही मूसाला ग्रंथ प्रदान केला आणि त्याला इस्राईलच्या संततीकरिता मार्गदर्शक बनविले की तुम्ही माझ्याशिवाय दुसऱ्या कोणालाही काम बनविणारा बनवू नका.

17:3

ذُرِّيَّةَ مَنۡ حَمَلۡنَا مَعَ نُوحٍۚ إِنَّهُۥ كَانَ عَبۡدٗا شَكُورٗا ﴿3﴾

Transliteration: Thurriyyata man hamalna maAAa noohin innahu kana AAabdan shakooran

Translation: ३. हे त्या लोकांपासून जन्मास आलेल्यांनो! ज्यांना आम्ही नूहच्या सोबत नौकेत चढविले होते. तो आमचा मोठा कृतज्ञशील दास होता.

17:4

وَقَضَيۡنَآ إِلَىٰ بَنِيٓ إِسۡرَـٰٓءِيلَ فِي ٱلۡكِتَٰبِ لَتُفۡسِدُنَّ فِي ٱلۡأَرۡضِ مَرَّتَيۡنِ وَلَتَعۡلُنَّ عُلُوّٗا كَبِيرٗا ﴿4﴾

Transliteration: Waqadayna ila banee israeela fee alkitabi latufsidunna fee alardi marratayni walataAAlunna AAuluwwan kabeeran

Translation: ४. आणि आम्ही इस्राईलच्या संततीकरिता त्यांच्या ग्रंथात स्पष्टतः निर्णय दिला होता की तुम्ही धरतीवर दोन वेळा उपद्रव निर्माण कराल, आणि तुम्ही फार जास्त अत्याचार कराल.

17:5

فَإِذَا جَآءَ وَعۡدُ أُولَىٰهُمَا بَعَثۡنَا عَلَيۡكُمۡ عِبَادٗا لَّنَآ أُوْلِي بَأۡسٖ شَدِيدٖ فَجَاسُواْ خِلَٰلَ ٱلدِّيَارِۚ وَكَانَ وَعۡدٗا مَّفۡعُولٗا ﴿5﴾

Transliteration: Faitha jaa waAAdu oolahuma baAAathna AAalaykum AAibadan lana olee basin shadeedin fajasoo khilala alddiyari wakana waAAdan mafAAoolan

Translation: ५. या दोन्ही वायद्यांपैकी पहिल्या वायद्याची वेळ येताच आम्ही तुमच्यासमोर आपल्या त्या दासांना उठवून उभे केले जे मोठे लढवय्ये होते, मग ते तुमच्या घरांमध्ये अगदी आतापर्यंत पसरले आणि अल्लाहचा वायदा पूर्ण होणारच होता.

17:6

ثُمَّ رَدَدۡنَا لَكُمُ ٱلۡكَرَّةَ عَلَيۡهِمۡ وَأَمۡدَدۡنَٰكُم بِأَمۡوَٰلٖ وَبَنِينَ وَجَعَلۡنَٰكُمۡ أَكۡثَرَ نَفِيرًا ﴿6﴾

Transliteration: Thumma radadna lakumu alkarrata AAalayhim waamdadnakum biamwalin wabaneena wajaAAalnakum akthara nafeeran

Translation: ६. मग आम्ही तुम्हाला त्यांच्यावर वर्चस्व देऊन (तुमचे दिवस) पालटले आणि विपुल धन संपत्ती आणि संततीने तुमची मदत केली आणि तुमचे समूह बळ वाढविले.

17:7

إِنۡ أَحۡسَنتُمۡ أَحۡسَنتُمۡ لِأَنفُسِكُمۡۖ وَإِنۡ أَسَأۡتُمۡ فَلَهَاۚ فَإِذَا جَآءَ وَعۡدُ ٱلۡأٓخِرَةِ لِيَسُـُٔواْ وُجُوهَكُمۡ وَلِيَدۡخُلُواْ ٱلۡمَسۡجِدَ كَمَا دَخَلُوهُ أَوَّلَ مَرَّةٖ وَلِيُتَبِّرُواْ مَا عَلَوۡاْ تَتۡبِيرًا ﴿7﴾

Transliteration: In ahsantum ahsantum lianfusikum wain asatum falaha faitha jaa waAAdu alakhirati liyasoooo wujoohakum waliyadkhuloo almasjida kama dakhaloohu awwala marratin waliyutabbiroo ma AAalaw tatbeeran

Translation: ७. जर तुम्ही सत्कर्म कराल तर स्वतः आपल्या फायद्याकरिता कराल आणि जर तुम्ही वाईट कर्मे कराल तर ते देखील स्वतःसाठीच. मग जेव्हा दुसऱ्या वायद्याची वेळ आली, तेव्हा (आम्ही दुसऱ्या दासांना पाठविले) यासाठी की त्यांनी तुमचा चेहरा बिघडवून टाकावा आणि पहिल्या खेपेप्रमाणे पुन्हा त्याच मस्जिदीत घुसावे आणि जी काही वस्तू ताब्यात येईल, तोडफोड करून मुळासकट उपटून टाकावी.

17:8

عَسَىٰ رَبُّكُمۡ أَن يَرۡحَمَكُمۡۚ وَإِنۡ عُدتُّمۡ عُدۡنَاۚ وَجَعَلۡنَا جَهَنَّمَ لِلۡكَٰفِرِينَ حَصِيرًا ﴿8﴾

Transliteration: AAasa rabbukum an yarhamakum wain AAudtum AAudna wajaAAalna jahannama lilkafireena haseeran

Translation: ८. आशा आहे की तुमचा पालनकर्ता तुमच्यावर दया करील. परंतु जर तुम्ही पुन्हा तेच करू लागाल तर आम्ही देखील पुन्हा तसेच करू, आणि आम्ही इन्कार करणाऱ्यांसाठी जहन्नमला कैदखाना बनवून ठेवले आहे.

17:9

إِنَّ هَٰذَا ٱلۡقُرۡءَانَ يَهۡدِي لِلَّتِي هِيَ أَقۡوَمُ وَيُبَشِّرُ ٱلۡمُؤۡمِنِينَ ٱلَّذِينَ يَعۡمَلُونَ ٱلصَّـٰلِحَٰتِ أَنَّ لَهُمۡ أَجۡرٗا كَبِيرٗا ﴿9﴾

Transliteration: Inna hatha alqurana yahdee lillatee hiya aqwamu wayubashshiru almumineena allatheena yaAAmaloona alssalihati anna lahum ajran kabeeran

Translation: ९. निःसंशय, हा कुरआन तो मार्ग दाखवितो, जो सर्वांत सरळ आहे, आणि सत्कर्म करणाऱ्या ईमानधारकांना ही खूशखबर देतो की त्यांच्यासाठी अतिशय चांगला मोबदला (प्रतिफळ) आहे.

17:10

وَأَنَّ ٱلَّذِينَ لَا يُؤۡمِنُونَ بِٱلۡأٓخِرَةِ أَعۡتَدۡنَا لَهُمۡ عَذَابًا أَلِيمٗا ﴿10﴾

Transliteration: Waanna allatheena la yuminoona bialakhirati aAAtadna lahum AAathaban aleeman

Translation: १०. आणि ते लोक, जे आखिरतवर विश्वास राखत नाही, त्यांच्यासाठी आम्ही दुःखदायक अज़ाब तयार करून ठेवला आहे.

17:11

وَيَدۡعُ ٱلۡإِنسَٰنُ بِٱلشَّرِّ دُعَآءَهُۥ بِٱلۡخَيۡرِۖ وَكَانَ ٱلۡإِنسَٰنُ عَجُولٗا ﴿11﴾

Transliteration: WayadAAu alinsanu bialshsharri duAAaahu bialkhayri wakana alinsanu AAajoolan

Translation: ११. आणि मनुष्य वाईट गोष्टींची दुआ प्रार्थना करू लागतो, अगदी त्याच्या स्वतःच्या भलाईच्या दुआ- प्रार्थनेसारखी, मनुष्य मोठा उतावळा आहे.

17:12

وَجَعَلۡنَا ٱلَّيۡلَ وَٱلنَّهَارَ ءَايَتَيۡنِۖ فَمَحَوۡنَآ ءَايَةَ ٱلَّيۡلِ وَجَعَلۡنَآ ءَايَةَ ٱلنَّهَارِ مُبۡصِرَةٗ لِّتَبۡتَغُواْ فَضۡلٗا مِّن رَّبِّكُمۡ وَلِتَعۡلَمُواْ عَدَدَ ٱلسِّنِينَ وَٱلۡحِسَابَۚ وَكُلَّ شَيۡءٖ فَصَّلۡنَٰهُ تَفۡصِيلٗا ﴿12﴾

Transliteration: WajaAAalna allayla waalnnahara ayatayni famahawna ayata allayli wajaAAalna ayata alnnahari mubsiratan litabtaghoo fadlan min rabbikum walitaAAlamoo AAadada alssineena waalhisaba wakulla shayin fassalnahu tafseelan

Translation: १२. आणि आम्ही रात्र आणि दिवसाला (आपल्या सामर्थ्याची) निशाणी बनविले आहे. रात्रीच्या निशाणीला आम्ही प्रकाशहीन (निस्तेज) केले आणि दिवसाच्या निशाणीला प्रकाशमान दाखविणारी बनविले आहे. यासाठी की तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कृपेचा शोध घेऊ शकावे. आणि यासाठीही की वर्षाची गणना आणि हिशोब जाणू शकावे. आणि प्रत्येक विषयाचे आम्ही सविस्तर निवेदन केले आहे.

17:13

وَكُلَّ إِنسَٰنٍ أَلۡزَمۡنَٰهُ طَـٰٓئِرَهُۥ فِي عُنُقِهِۦۖ وَنُخۡرِجُ لَهُۥ يَوۡمَ ٱلۡقِيَٰمَةِ كِتَٰبٗا يَلۡقَىٰهُ مَنشُورًا ﴿13﴾

Transliteration: Wakulla insanin alzamnahu tairahu fee AAunuqihi wanukhriju lahu yawma alqiyamati kitaban yalqahu manshooran

Translation: १३. आणि आम्ही माणसाचे चांगले-वाईट त्याच्या गळ्यात टाकले आहे, आणि कयामतच्या दिवशी आम्ही त्याचा कर्म-लेख बाहेर काढू, जो त्याला आपल्यावर खुला असलेला आढळेल.

17:14

ٱقۡرَأۡ كِتَٰبَكَ كَفَىٰ بِنَفۡسِكَ ٱلۡيَوۡمَ عَلَيۡكَ حَسِيبٗا ﴿14﴾

Transliteration: Iqra kitabaka kafa binafsika alyawma AAalayka haseeban

Translation: १४. आता स्वतःच आपले कर्मपत्र वाचून घ्या. आज तर तू स्वतःच आपला फैसला करण्यास पुरेसा आहे.

17:15

مَّنِ ٱهۡتَدَىٰ فَإِنَّمَا يَهۡتَدِي لِنَفۡسِهِۦۖ وَمَن ضَلَّ فَإِنَّمَا يَضِلُّ عَلَيۡهَاۚ وَلَا تَزِرُ وَازِرَةٞ وِزۡرَ أُخۡرَىٰۗ وَمَا كُنَّا مُعَذِّبِينَ حَتَّىٰ نَبۡعَثَ رَسُولٗا ﴿15﴾

Transliteration: Mani ihtada fainnama yahtadee linafsihi waman dalla fainnama yadillu AAalayha wala taziru waziratun wizra okhra wama kunna muAAaththibeena hatta nabAAatha rasoolan

Translation: १५. जो मनुष्य मार्गदर्शन प्राप्त करतो, तो स्वतः आपल्या भल्यासाठी मार्गदर्शन प्राप्त करतो आणि जो मार्गभ्रष्ट होईल तर त्याचे ओझे त्याच्यावरच आहे. कोणीही ओझे बाळगणारा दुसऱ्या कुणाचे ओझे आपल्यावर लादून घेणार नाही आणि आमचा हा नियम नाही की पैगंबर पाठविण्यापूर्वीच अज़ाब (शिक्षा-यातना) पाठवावा.

17:16

وَإِذَآ أَرَدۡنَآ أَن نُّهۡلِكَ قَرۡيَةً أَمَرۡنَا مُتۡرَفِيهَا فَفَسَقُواْ فِيهَا فَحَقَّ عَلَيۡهَا ٱلۡقَوۡلُ فَدَمَّرۡنَٰهَا تَدۡمِيرٗا ﴿16﴾

Transliteration: Waitha aradna an nuhlika qaryatan amarna mutrafeeha fafasaqoo feeha fahaqqa AAalayha alqawlu fadammarnaha tadmeeran

Translation: १६. आणि जेव्हा आम्ही एखाद्या वस्तीचा सर्वनाश करण्याचा इरादा करून घेतो तेव्हा तिथल्या सुखवस्तू (सुसंपन्न) लोकांना काही आदेश देतो आणि ते त्या वस्तीत उघडपणे अवज्ञा करू लागतात, तेव्हा त्यांच्यावर (शिक्षा-यातनेचा) फैसला लागू होतो आणि मग आम्ही त्या वस्तीची उलथापालथ करून टाकतो.

17:17

وَكَمۡ أَهۡلَكۡنَا مِنَ ٱلۡقُرُونِ مِنۢ بَعۡدِ نُوحٖۗ وَكَفَىٰ بِرَبِّكَ بِذُنُوبِ عِبَادِهِۦ خَبِيرَۢا بَصِيرٗا ﴿17﴾

Transliteration: Wakam ahlakna mina alqurooni min baAAdi noohin wakafa birabbika bithunoobi AAibadihi khabeeran baseeran

Translation: १७. आणि आम्ही नूहनंतरही अनेक समुदाय नष्ट करून टाकले आणि तुमचा पालनकर्ता आपल्या दासांच्या अपराधांना चांगल्या प्रकारे जाणून आहे आणि चांगल्या प्रकारे पाहणारा आहे.

17:18

مَّن كَانَ يُرِيدُ ٱلۡعَاجِلَةَ عَجَّلۡنَا لَهُۥ فِيهَا مَا نَشَآءُ لِمَن نُّرِيدُ ثُمَّ جَعَلۡنَا لَهُۥ جَهَنَّمَ يَصۡلَىٰهَا مَذۡمُومٗا مَّدۡحُورٗا ﴿18﴾

Transliteration: Man kana yureedu alAAajilata AAajjalna lahu feeha ma nashao liman nureedu thumma jaAAalna lahu jahannama yaslaha mathmooman madhooran

Translation: १८. ज्याची इच्छा फक्त या शीघ्रतापूर्ण जगापुरतीच असेल तर त्याला आम्ही इथे, जेवढे देऊ इच्छितो लवकर प्रदान करतो. शेवटी मात्र त्याच्यासाठी आम्ही जहन्नम निश्चित करतो, जिथे तो मोठ्या वाईट अवस्थेत, धिःक्कारला गेलेला दाखल होईल.

17:19

وَمَنۡ أَرَادَ ٱلۡأٓخِرَةَ وَسَعَىٰ لَهَا سَعۡيَهَا وَهُوَ مُؤۡمِنٞ فَأُوْلَـٰٓئِكَ كَانَ سَعۡيُهُم مَّشۡكُورٗا ﴿19﴾

Transliteration: Waman arada alakhirata wasaAAa laha saAAyaha wahuwa muminun faolaika kana saAAyuhum mashkooran

Translation: १९. आणि जो आखिरतची इच्छा बाळगेल, आणि त्यासाठी जसा प्रयत्न करायला हवा, तसा तो करतही असेल आणि तो ईमान राखणाराही असेल तर मग हेच ते लोक होत, ज्याच्या प्रयत्नाला अल्लाहच्या ठायी पुरेपूर सन्मान दिला जाईल.

17:20

كُلّٗا نُّمِدُّ هَـٰٓؤُلَآءِ وَهَـٰٓؤُلَآءِ مِنۡ عَطَآءِ رَبِّكَۚ وَمَا كَانَ عَطَآءُ رَبِّكَ مَحۡظُورًا ﴿20﴾

Transliteration: Kullan numiddu haolai wahaolai min AAatai rabbika wama kana AAatao rabbika mahthooran

Translation: २०. प्रत्येकाला आम्ही प्रदान करीत असतो यांनाही आणि त्यांनाही, तुमच्या पालनकर्त्याच्या देणग्यांमधून, आणि तुमच्या पालनकर्त्याचा अनुग्रह थांबलेला नाही.

17:21

ٱنظُرۡ كَيۡفَ فَضَّلۡنَا بَعۡضَهُمۡ عَلَىٰ بَعۡضٖۚ وَلَلۡأٓخِرَةُ أَكۡبَرُ دَرَجَٰتٖ وَأَكۡبَرُ تَفۡضِيلٗا ﴿21﴾

Transliteration: Onthur kayfa faddalna baAAdahum AAala baAAdin walalakhiratu akbaru darajatin waakbaru tafdeelan

Translation: २१. पाहा, त्यांच्यात एकाला एकावर कशा प्रकारे श्रेष्ठता प्रदान केली आहे आणि आखिरत (मरणोत्तर जीवन) तर दर्जाच्या दृष्टीने अतिशय उत्तम आहे आणि श्रेष्ठतेच्या दृष्टीनेही फारच उत्तम आहे.

17:22

لَّا تَجۡعَلۡ مَعَ ٱللَّهِ إِلَٰهًا ءَاخَرَ فَتَقۡعُدَ مَذۡمُومٗا مَّخۡذُولٗا ﴿22﴾

Transliteration: La tajAAal maAAa Allahi ilahan akhara fataqAAuda mathmooman makhthoolan

Translation: २२. अल्लाहसोबत दुसऱ्या कुणाला उपास्य बनवू नका की शेवटी तुम्ही अपमानित, असहाय्य होऊन बसाल.

17:23

وَقَضَىٰ رَبُّكَ أَلَّا تَعۡبُدُوٓاْ إِلَّآ إِيَّاهُ وَبِٱلۡوَٰلِدَيۡنِ إِحۡسَٰنًاۚ إِمَّا يَبۡلُغَنَّ عِندَكَ ٱلۡكِبَرَ أَحَدُهُمَآ أَوۡ كِلَاهُمَا فَلَا تَقُل لَّهُمَآ أُفّٖ وَلَا تَنۡهَرۡهُمَا وَقُل لَّهُمَا قَوۡلٗا كَرِيمٗا ﴿23﴾

Transliteration: Waqada rabbuka alla taAAbudoo illa iyyahu wabialwalidayni ihsanan imma yablughanna AAindaka alkibara ahaduhuma aw kilahuma fala taqul lahuma offin wala tanharhuma waqul lahuma qawlan kareeman

Translation: २३. आणि तुमच्या पालनकर्त्याने उघड आदेश दिलेला आहे की तुम्ही त्याच्याशिवाय दुसऱ्या कोणाचीही उपासना करू नका आणि माता-पित्याशी सद्‌व्यवहार करा, जर तुमच्या उपस्थितीत (हयातीत) यांच्यापैकी एक किंवा हे दोघे वृद्धावस्थेस पोहोचतील तर त्यांना ‘अरे’ सुद्धा बोलू नका, त्यांना दाटवू नका, उलट त्यांच्याशी आदर-सन्मानाने बोलत जा.

17:24

وَٱخۡفِضۡ لَهُمَا جَنَاحَ ٱلذُّلِّ مِنَ ٱلرَّحۡمَةِ وَقُل رَّبِّ ٱرۡحَمۡهُمَا كَمَا رَبَّيَانِي صَغِيرٗا ﴿24﴾

Transliteration: Waikhfid lahuma janaha alththulli mina alrrahmati waqul rabbi irhamhuma kama rabbayanee sagheeran

Translation: २४. आणि नरमी व प्रेमासह त्यांच्यासमोर विनम्रतापूर्वक हात पसरवून ठेवा१ आणि दुआ-प्रार्थना करीत राहा, हे माझ्या पालनकर्त्या! यांच्यावर अशीच दया कर जशी यांनी माझ्या बालपणात माझे पालनपोषण करण्यात केली आहे.

17:25

رَّبُّكُمۡ أَعۡلَمُ بِمَا فِي نُفُوسِكُمۡۚ إِن تَكُونُواْ صَٰلِحِينَ فَإِنَّهُۥ كَانَ لِلۡأَوَّـٰبِينَ غَفُورٗا ﴿25﴾

Transliteration: Rabbukum aAAlamu bima fee nufoosikum in takoonoo saliheena fainnahu kana lilawwabeena ghafooran

Translation: २५. जे काही तुमच्या हृदयात आहे ते तुमचा पालनकर्ता चांगल्या प्रकारे जाणतो. जर तुम्ही नेक सदाचारी असाल तर तो क्षमा-याचना करणाऱ्यांना माफ करणारा आहे.

17:26

وَءَاتِ ذَا ٱلۡقُرۡبَىٰ حَقَّهُۥ وَٱلۡمِسۡكِينَ وَٱبۡنَ ٱلسَّبِيلِ وَلَا تُبَذِّرۡ تَبۡذِيرًا ﴿26﴾

Transliteration: Waati tha alqurba haqqahu waalmiskeena waibna alssabeeli wala tubaththir tabtheeran

Translation: २६. आणि नातेवाईकांचा, आणि दीन-दुबळ्यांचा आणि प्रवाशांचा हक्क अदा करीत राहा, आणि अपव्यय करण्यापासून दूर राहा.

17:27

إِنَّ ٱلۡمُبَذِّرِينَ كَانُوٓاْ إِخۡوَٰنَ ٱلشَّيَٰطِينِۖ وَكَانَ ٱلشَّيۡطَٰنُ لِرَبِّهِۦ كَفُورٗا ﴿27﴾

Transliteration: Inna almubaththireena kanoo ikhwana alshshayateeni wakana alshshaytanu lirabbihi kafooran

Translation: २७. निश्चितच, अपव्यय (उधळपट्टी) करणारे सैतानाचे बांधव आहेत, आणि सैतान आपल्या पालनकर्त्याशी मोठा कृतघ्न आहे.

17:28

وَإِمَّا تُعۡرِضَنَّ عَنۡهُمُ ٱبۡتِغَآءَ رَحۡمَةٖ مِّن رَّبِّكَ تَرۡجُوهَا فَقُل لَّهُمۡ قَوۡلٗا مَّيۡسُورٗا ﴿28﴾

Transliteration: Waimma tuAAridanna AAanhumu ibtighaa rahmatin min rabbika tarjooha faqul lahum qawlan maysooran

Translation: २८. आणि आपल्या पालनकर्त्याच्या त्या दया-कृपेचा शोध घेण्यात, जिची तू आशा बाळगतो, जर तुला त्यांच्यापासून तोंड फिरवावे लागेल तर अशाही स्थितीत तू त्यांना चांगल्या प्रकारे आणि नरमीने समजाविले पाहिजे.

17:29

وَلَا تَجۡعَلۡ يَدَكَ مَغۡلُولَةً إِلَىٰ عُنُقِكَ وَلَا تَبۡسُطۡهَا كُلَّ ٱلۡبَسۡطِ فَتَقۡعُدَ مَلُومٗا مَّحۡسُورًا ﴿29﴾

Transliteration: Wala tajAAal yadaka maghloolatan ila AAunuqika wala tabsutha kulla albasti fataqAAuda malooman mahsooran

Translation: २९. आणि आपला हात आपल्या गळ्याशी बांधून ठेवू नका आणि ना तो पूर्णपणे मोकळा सोडा, मग धिःक्कारलेला आणि पश्चात्तापित होऊन बसावे.

17:30

إِنَّ رَبَّكَ يَبۡسُطُ ٱلرِّزۡقَ لِمَن يَشَآءُ وَيَقۡدِرُۚ إِنَّهُۥ كَانَ بِعِبَادِهِۦ خَبِيرَۢا بَصِيرٗا ﴿30﴾

Transliteration: Inna rabbaka yabsutu alrrizqa liman yashao wayaqdiru innahu kana biAAibadihi khabeeran baseeran

Translation: ३०. निःसंशय, तुमचा पालनकर्ता, ज्याला इच्छितो रोजी (आजिविका) विस्तृत करतो आणि ज्याच्यासाठी इच्छितो संकुचित (तंग) करतो. निःसंशय, तो आपल्या दासांची पुरेपूर खबर राखतो आणि खूप चांगल्या प्रकारे पाहणारा आहे.

17:31

وَلَا تَقۡتُلُوٓاْ أَوۡلَٰدَكُمۡ خَشۡيَةَ إِمۡلَٰقٖۖ نَّحۡنُ نَرۡزُقُهُمۡ وَإِيَّاكُمۡۚ إِنَّ قَتۡلَهُمۡ كَانَ خِطۡـٔٗا كَبِيرٗا ﴿31﴾

Transliteration: Wala taqtuloo awladakum khashyata imlaqin nahnu narzuquhum waiyyakum inna qatlahum kana khitan kabeeran

Translation: ३१. आणि दारिद्य्राच्या भयाने आपल्या संततीला मारून टाकू नका. त्यांना आणि तुम्हाला आम्हीच रोजी (आजिविका) प्रदान करतो. निःसंशय, त्यांची हत्या करणे फार मोठा अपराध आहे.

17:32

وَلَا تَقۡرَبُواْ ٱلزِّنَىٰٓۖ إِنَّهُۥ كَانَ فَٰحِشَةٗ وَسَآءَ سَبِيلٗا ﴿32﴾

Transliteration: Wala taqraboo alzzina innahu kana fahishatan wasaa sabeelan

Translation: ३२. आणि खबरदार! व्यभिचाराच्या जवळही जाऊ नका, कारण ती मोठी निर्लज्जता आहे, आणि अतिशय वाईट मार्ग आहे.

17:33

وَلَا تَقۡتُلُواْ ٱلنَّفۡسَ ٱلَّتِي حَرَّمَ ٱللَّهُ إِلَّا بِٱلۡحَقِّۗ وَمَن قُتِلَ مَظۡلُومٗا فَقَدۡ جَعَلۡنَا لِوَلِيِّهِۦ سُلۡطَٰنٗا فَلَا يُسۡرِف فِّي ٱلۡقَتۡلِۖ إِنَّهُۥ كَانَ مَنصُورٗا ﴿33﴾

Transliteration: Wala taqtuloo alnnafsa allatee harrama Allahu illa bialhaqqi waman qutila mathlooman faqad jaAAalna liwaliyyihi sultanan fala yusrif fee alqatli innahu kana mansooran

Translation: ३३. आणि एखाद्या जीवाला, ज्याला मारणे अल्लाहने हराम केले आहे, कधीही अवैधरित्या मारू नका (त्याची हत्या करू नका) आणि जो मनुष्य निरपराध अवस्थेत ठार मारला जाईल तर आम्ही त्याच्या वारसाला हक्क देऊन ठेवला आहे. परंतु त्याने (प्रतिशोध म्हणून) ठार मारण्यात घाई करू नये. निःसंशय त्याची मदत केली गेली आहे.

17:34

وَلَا تَقۡرَبُواْ مَالَ ٱلۡيَتِيمِ إِلَّا بِٱلَّتِي هِيَ أَحۡسَنُ حَتَّىٰ يَبۡلُغَ أَشُدَّهُۥۚ وَأَوۡفُواْ بِٱلۡعَهۡدِۖ إِنَّ ٱلۡعَهۡدَ كَانَ مَسۡـُٔولٗا ﴿34﴾

Transliteration: Wala taqraboo mala alyateemi illa biallatee hiya ahsanu hatta yablugha ashuddahu waawfoo bialAAahdi inna alAAahda kana masoolan

Translation: ३४. आणि अनाथाच्या धन-संपत्तीच्या जवळही जाऊ नका, त्या पद्धतीशिवाय, जी अधिक चांगली असे, येथपर्यंत की ते आपल्या सज्ञान होण्याच्या वयास पोहचावेत आणि वायदा पूर्ण करीत जा कारण की वायद्याविषयी विचारणा होईल.

17:35

وَأَوۡفُواْ ٱلۡكَيۡلَ إِذَا كِلۡتُمۡ وَزِنُواْ بِٱلۡقِسۡطَاسِ ٱلۡمُسۡتَقِيمِۚ ذَٰلِكَ خَيۡرٞ وَأَحۡسَنُ تَأۡوِيلٗا ﴿35﴾

Transliteration: Waawfoo alkayla itha kiltum wazinoo bialqistasi almustaqeemi thalika khayrun waahsanu taweelan

Translation: ३५. आणि जेव्हा मापून द्याल तेव्हा पूर्ण माप भरून द्या आणि सरळ तराजूने तोलून द्या. हेच चांगले आहे आणि याचा परिणामही फार चांगला आहे.

17:36

وَلَا تَقۡفُ مَا لَيۡسَ لَكَ بِهِۦ عِلۡمٌۚ إِنَّ ٱلسَّمۡعَ وَٱلۡبَصَرَ وَٱلۡفُؤَادَ كُلُّ أُوْلَـٰٓئِكَ كَانَ عَنۡهُ مَسۡـُٔولٗا ﴿36﴾

Transliteration: Wala taqfu ma laysa laka bihi AAilmun inna alssamAAa waalbasara waalfuada kullu olaika kana AAanhu masoolan

Translation: ३६. आणि ज्या गोष्टीची तुम्हाला खबरही नसेल, अशा गोष्टीच्या मागे लागू नका, कारण कान आणि डोळे आणि हृदय यांच्यापैकी प्रत्येकाला विचारणा केली जाणार आहे.

17:37

وَلَا تَمۡشِ فِي ٱلۡأَرۡضِ مَرَحًاۖ إِنَّكَ لَن تَخۡرِقَ ٱلۡأَرۡضَ وَلَن تَبۡلُغَ ٱلۡجِبَالَ طُولٗا ﴿37﴾

Transliteration: Wala tamshi fee alardi marahan innaka lan takhriqa alarda walan tablugha aljibala toolan

Translation: ३७. आणि जमिनीवर मोठ्या दिमाखाने व गर्वाने चालू नका, कारण (अशाने) ना तुम्ही जमिनीला फाडू शकता आणि ना पर्वतांच्या उंचीपर्यंत पोहोचू शकता.

17:38

كُلُّ ذَٰلِكَ كَانَ سَيِّئُهُۥ عِندَ رَبِّكَ مَكۡرُوهٗا ﴿38﴾

Transliteration: Kullu thalika kana sayyiohu AAinda rabbika makroohan

Translation: ३८. या सर्व कामांचा वाईटपणा तुमच्या पालनकर्त्याजवळ अतिशय अप्रिय आहे.

17:39

ذَٰلِكَ مِمَّآ أَوۡحَىٰٓ إِلَيۡكَ رَبُّكَ مِنَ ٱلۡحِكۡمَةِۗ وَلَا تَجۡعَلۡ مَعَ ٱللَّهِ إِلَٰهًا ءَاخَرَ فَتُلۡقَىٰ فِي جَهَنَّمَ مَلُومٗا مَّدۡحُورًا ﴿39﴾

Transliteration: Thalika mimma awha ilayka rabbuka mina alhikmati wala tajAAal maAAa Allahi ilahan akhara fatulqa fee jahannama malooman madhooran

Translation: ३९. हे देखील त्या वहयी (प्रकाशना) पैकी आहे, जिला तुमच्या पालनकर्त्याने तुमच्याकडे हिकमतीने उतरविले आहे, यास्तव अल्लाहसोबत दुसऱ्या कोणत्याही उपास्य बनवू नका अन्यथा धिःक्कार करून आणि अपमानित करून जहन्नममध्ये टाकले जाल.

17:40

أَفَأَصۡفَىٰكُمۡ رَبُّكُم بِٱلۡبَنِينَ وَٱتَّخَذَ مِنَ ٱلۡمَلَـٰٓئِكَةِ إِنَٰثًاۚ إِنَّكُمۡ لَتَقُولُونَ قَوۡلًا عَظِيمٗا ﴿40﴾

Transliteration: Afaasfakum rabbukum bialbaneena waittakhatha mina almalaikati inathan innakum lataqooloona qawlan AAatheeman

Translation: ४०. काय पुत्रांकरिता अल्लाहने तुम्हाला निवडून घेतले आहे आणि स्वतः आपल्याकरिता फरिश्त्यांना मुली बनवून घेतले? खात्रीने तुम्ही फार मोठे बोल बोलत आहात.

17:41

وَلَقَدۡ صَرَّفۡنَا فِي هَٰذَا ٱلۡقُرۡءَانِ لِيَذَّكَّرُواْ وَمَا يَزِيدُهُمۡ إِلَّا نُفُورٗا ﴿41﴾

Transliteration: Walaqad sarrafna fee hatha alqurani liyaththakkaroo wama yazeeduhum illa nufooran

Translation: ४१. आणि आम्ही तर या कुरआनात सर्व प्रकारे सांगितले आहे की लोकांच्या ध्यानी यावे, परंतु यावरही त्यांचा तिरस्कारच वाढतो.

17:42

قُل لَّوۡ كَانَ مَعَهُۥٓ ءَالِهَةٞ كَمَا يَقُولُونَ إِذٗا لَّٱبۡتَغَوۡاْ إِلَىٰ ذِي ٱلۡعَرۡشِ سَبِيلٗا ﴿42﴾

Transliteration: Qul law kana maAAahu alihatun kama yaqooloona ithan laibtaghaw ila thee alAAarshi sabeelan

Translation: ४२. तुम्ही सांगा, जर अल्लाहसोबत आणखी दुसरे उपास्य असते, जसे की हे लोक सांगतात, तर अवश्य त्यांनी आतापर्यंत अर्शच्या स्वामीकडे मार्ग शोधला असता.

17:43

سُبۡحَٰنَهُۥ وَتَعَٰلَىٰ عَمَّا يَقُولُونَ عُلُوّٗا كَبِيرٗا ﴿43﴾

Transliteration: Subhanahu wataAAala AAamma yaqooloona AAuluwwan kabeeran

Translation: ४३. जे काही हे सांगतात, त्याहून तो पवित्र आणि महान, अतिशय दूर, आणि अतिशय उच्चतम आहे.

17:44

تُسَبِّحُ لَهُ ٱلسَّمَٰوَٰتُ ٱلسَّبۡعُ وَٱلۡأَرۡضُ وَمَن فِيهِنَّۚ وَإِن مِّن شَيۡءٍ إِلَّا يُسَبِّحُ بِحَمۡدِهِۦ وَلَٰكِن لَّا تَفۡقَهُونَ تَسۡبِيحَهُمۡۚ إِنَّهُۥ كَانَ حَلِيمًا غَفُورٗا ﴿44﴾

Transliteration: Tusabbihu lahu alssamawatu alssabAAu waalardu waman feehinna wain min shayin illa yusabbihu bihamdihi walakin la tafqahoona tasbeehahum innahu kana haleeman ghafooran

Translation: ४४. सप्त आकाश आणि धरती, आणि जे काही त्यांच्यात आहे, सर्व त्याचेच स्तुति-गान करतात. अशी एकही वस्तू नाही, जी पवित्रता आणि महानतेसह त्याचे स्मरण करीत नसेल. मात्र हे खरे आहे की तुम्ही तिचे महिमागान समजू शकत नाही. निःसंशय अल्लाह मोठा सहनशील आणि माफ करणारा आहे.

17:45

وَإِذَا قَرَأۡتَ ٱلۡقُرۡءَانَ جَعَلۡنَا بَيۡنَكَ وَبَيۡنَ ٱلَّذِينَ لَا يُؤۡمِنُونَ بِٱلۡأٓخِرَةِ حِجَابٗا مَّسۡتُورٗا ﴿45﴾

Transliteration: Waitha qarata alqurana jaAAalna baynaka wabayna allatheena la yuminoona bialakhirati hijaban mastooran

Translation: ४५. आणि जेव्हा तुम्ही कुरआन पठण करता, तेव्हा आम्ही तुमच्या आणि त्या लोकांच्या दरम्यान, जे आखिरतवर विश्वास ठेवत नाही, एक गुप्त पडदा टाकतो.

17:46

وَجَعَلۡنَا عَلَىٰ قُلُوبِهِمۡ أَكِنَّةً أَن يَفۡقَهُوهُ وَفِيٓ ءَاذَانِهِمۡ وَقۡرٗاۚ وَإِذَا ذَكَرۡتَ رَبَّكَ فِي ٱلۡقُرۡءَانِ وَحۡدَهُۥ وَلَّوۡاْ عَلَىٰٓ أَدۡبَٰرِهِمۡ نُفُورٗا ﴿46﴾

Transliteration: WajaAAalna AAala quloobihim akinnatan an yafqahoohu wafee athanihim waqran waitha thakarta rabbaka fee alqurani wahdahu wallaw AAala adbarihim nufooran

Translation: ४६. आणि त्यांच्या हृदयांवर पडदे टाकले आहेत की त्यांनी त्याला समजावे आणि त्यांच्या कानात बधीरता आणि जेव्हा तुम्ही केवळ अल्लाहचेच वर्णन त्याच्या एकमेवतेसह या कुरआनात करता तेव्हा ते तोंड फिरवून पळ काढतात.

17:47

نَّحۡنُ أَعۡلَمُ بِمَا يَسۡتَمِعُونَ بِهِۦٓ إِذۡ يَسۡتَمِعُونَ إِلَيۡكَ وَإِذۡ هُمۡ نَجۡوَىٰٓ إِذۡ يَقُولُ ٱلظَّـٰلِمُونَ إِن تَتَّبِعُونَ إِلَّا رَجُلٗا مَّسۡحُورًا ﴿47﴾

Transliteration: Nahnu aAAlamu bima yastamiAAoona bihi ith yastamiAAoona ilayka waith hum najwa ith yaqoolu alththalimoona in tattabiAAoona illa rajulan mashooran

Translation: ४७. ज्या हेतुने ते कुरआन ऐकतात, त्यांचे इरादे आम्ही चांगल्या प्रकारे जाणतो. जेव्हा हे तुमच्याकडे कान लावून असतात. तेव्हा देखील, आणि जेव्हा हे सल्लामसलत करतात तेव्हाही वास्तविक हे अत्याचारी लोक म्हणतात की तुम्ही अशा व्यक्तीचे अनुसरण करण्यात मग्न आहात, ज्याच्यावर जादूटोणा केला गेला आहे.

17:48

ٱنظُرۡ كَيۡفَ ضَرَبُواْ لَكَ ٱلۡأَمۡثَالَ فَضَلُّواْ فَلَا يَسۡتَطِيعُونَ سَبِيلٗا ﴿48﴾

Transliteration: Onthur kayfa daraboo laka alamthala fadalloo fala yastateeAAoona sabeelan

Translation: ४८. जरा पहा तरी तुमच्या साठी ते कस कशी उदाहरणे देतात यास्तव ते चुकीच्या मार्गाकडे जात आहेत आता तर सरळ मार्ग प्राप्त करणे त्यांना शक्य नाही

17:49

وَقَالُوٓاْ أَءِذَا كُنَّا عِظَٰمٗا وَرُفَٰتًا أَءِنَّا لَمَبۡعُوثُونَ خَلۡقٗا جَدِيدٗا ﴿49﴾

Transliteration: Waqaloo aitha kunna AAithaman warufatan ainna lamabAAoothoona khalqan jadeedan

Translation: ४९. ते म्हणाले, काय जेव्हा आम्ही हाडे आणि धूळ माती होऊन जाऊ तर काय आम्ही नव्याने जन्मास येऊन दुसऱ्यांदा उठवून उभे केले जाऊ?

17:50

قُلۡ كُونُواْ حِجَارَةً أَوۡ حَدِيدًا ﴿50﴾

Transliteration: Qul koonoo hijaratan aw hadeedan

Translation: ५०. उत्तर द्या की तुम्ही दगड बना किंवा लोखंड.

17:51

أَوۡ خَلۡقٗا مِّمَّا يَكۡبُرُ فِي صُدُورِكُمۡۚ فَسَيَقُولُونَ مَن يُعِيدُنَاۖ قُلِ ٱلَّذِي فَطَرَكُمۡ أَوَّلَ مَرَّةٖۚ فَسَيُنۡغِضُونَ إِلَيۡكَ رُءُوسَهُمۡ وَيَقُولُونَ مَتَىٰ هُوَۖ قُلۡ عَسَىٰٓ أَن يَكُونَ قَرِيبٗا ﴿51﴾

Transliteration: Aw khalqan mimma yakburu fee sudoorikum fasayaqooloona man yuAAeeduna quli allathee fatarakum awwala marratin fasayunghidoona ilayka ruoosahum wayaqooloona mata huwa qul AAasa an yakoona qareeban

Translation: ५१. किंवा एखादी अशी वस्तू, जी तुमच्या मनात अतिशय महान वाटत असेल. मग त्यांनी विचारावे की असा कोण आहे, जो दुसऱ्यांदा आमचे जीवन परत करेल? तुम्ही उत्तर द्या की तोच (अल्लाह) ज्याने तुम्हाला पहिल्या खेपेस निर्माण केले. यावर ते आपले डोके हलवून तुम्हाला विचारतील की, बरे हे केव्हा घडून येईल? तर तुम्ही उत्तर द्या की नवल नव्हे की ते लवकरच घडून येईल.

17:52

يَوۡمَ يَدۡعُوكُمۡ فَتَسۡتَجِيبُونَ بِحَمۡدِهِۦ وَتَظُنُّونَ إِن لَّبِثۡتُمۡ إِلَّا قَلِيلٗا ﴿52﴾

Transliteration: Yawma yadAAookum fatastajeeboona bihamdihi watathunnoona in labithtum illa qaleelan

Translation: ५२. ज्या दिवशी तो तुम्हाला बोलावील, तुम्ही त्याची प्रशंसा करत आज्ञापालन कराल आणि अनुमान लावाल की तुम्ही फार कमी काळ राहिलात.

17:53

وَقُل لِّعِبَادِي يَقُولُواْ ٱلَّتِي هِيَ أَحۡسَنُۚ إِنَّ ٱلشَّيۡطَٰنَ يَنزَغُ بَيۡنَهُمۡۚ إِنَّ ٱلشَّيۡطَٰنَ كَانَ لِلۡإِنسَٰنِ عَدُوّٗا مُّبِينٗا ﴿53﴾

Transliteration: Waqul liAAibadee yaqooloo allatee hiya ahsanu inna alshshaytana yanzaghu baynahum inna alshshaytana kana lilinsani AAaduwwan mubeenan

Translation: ५३. आणि माझ्या दासांना सांगा की त्यांनी फार उत्तम गोष्ट आपल्या मुखातून काढत जावी, कारण सैतान आपसात फूट पाडतो. निश्चितच सैतान माणसाचा उघड शत्रू आहे.

17:54

رَّبُّكُمۡ أَعۡلَمُ بِكُمۡۖ إِن يَشَأۡ يَرۡحَمۡكُمۡ أَوۡ إِن يَشَأۡ يُعَذِّبۡكُمۡۚ وَمَآ أَرۡسَلۡنَٰكَ عَلَيۡهِمۡ وَكِيلٗا ﴿54﴾

Transliteration: Rabbukum aAAlamu bikum in yasha yarhamkum aw in yasha yuAAaththibkum wama arsalnaka AAalayhim wakeelan

Translation: ५४. तुमचा पालनकर्ता तुमची अवस्था तुमच्यापेक्षा अधिक जाणणारा आहे. तो जर इच्छिल तर तुमच्यावर दया करेल, इच्छिल तर तुम्हाला शिक्षा देईल. आम्ही तुम्हाला त्यांच्यावर देखरेख ठेवणारा बनवून पाठविले नाही.

17:55

وَرَبُّكَ أَعۡلَمُ بِمَن فِي ٱلسَّمَٰوَٰتِ وَٱلۡأَرۡضِۗ وَلَقَدۡ فَضَّلۡنَا بَعۡضَ ٱلنَّبِيِّـۧنَ عَلَىٰ بَعۡضٖۖ وَءَاتَيۡنَا دَاوُۥدَ زَبُورٗا ﴿55﴾

Transliteration: Warabbuka aAAlamu biman fee alssamawati waalardi walaqad faddalna baAAda alnnabiyyeena AAala baAAdin waatayna dawooda zabooran

Translation: ५५. आणि आकाशांमध्ये आणि धरतीत जे काही आहे, ते सर्व तुमचा पालनकर्ता चांगल्या प्रकारे जाणतो, आम्ही काही पैगंबरांना काहींवर श्रेष्ठता प्रदान केली आहे आणि दाऊदला जबूर आम्हीच प्रदान केले.

17:56

قُلِ ٱدۡعُواْ ٱلَّذِينَ زَعَمۡتُم مِّن دُونِهِۦ فَلَا يَمۡلِكُونَ كَشۡفَ ٱلضُّرِّ عَنكُمۡ وَلَا تَحۡوِيلًا ﴿56﴾

Transliteration: Quli odAAu allatheena zaAAamtum min doonihi fala yamlikoona kashfa alddurri AAankum wala tahweelan

Translation: ५६. तुम्ही सांगा, (अल्लाह) शिवाय ज्यांना तुम्ही (उपास्य) समजत आहात, त्यांना दुआ-प्रार्थना करा, परंतु ते ना तुमचे एखादे दुःख दूर करू शकतात आणि ना बदलू शकतात.१

17:57

أُوْلَـٰٓئِكَ ٱلَّذِينَ يَدۡعُونَ يَبۡتَغُونَ إِلَىٰ رَبِّهِمُ ٱلۡوَسِيلَةَ أَيُّهُمۡ أَقۡرَبُ وَيَرۡجُونَ رَحۡمَتَهُۥ وَيَخَافُونَ عَذَابَهُۥٓۚ إِنَّ عَذَابَ رَبِّكَ كَانَ مَحۡذُورٗا ﴿57﴾

Transliteration: Olaika allatheena yadAAoona yabtaghoona ila rabbihimu alwaseelata ayyuhum aqrabu wayarjoona rahmatahu wayakhafoona AAathabahu inna AAathaba rabbika kana mahthooran

Translation: ५७. ज्यांना हे लोक दुआ प्रार्थना करतात, ते स्वतः आपल्या पालनकर्त्याची निकटता शोधत असतात की त्यांच्यापैकी कोण अधिक निकट होईल, ते तर स्वतः त्याच्या दया-कृपेची आशा बाळगतात आणि त्याच्या शिक्षा-यातनेपासून भयभीत राहतात. निःसंशय तुमच्या पालनकर्त्याचा अज़ाब (शिक्षा-यातना) भय राखण्याची गोष्ट आहे.

17:58

وَإِن مِّن قَرۡيَةٍ إِلَّا نَحۡنُ مُهۡلِكُوهَا قَبۡلَ يَوۡمِ ٱلۡقِيَٰمَةِ أَوۡ مُعَذِّبُوهَا عَذَابٗا شَدِيدٗاۚ كَانَ ذَٰلِكَ فِي ٱلۡكِتَٰبِ مَسۡطُورٗا ﴿58﴾

Transliteration: Wain min qaryatin illa nahnu muhlikooha qabla yawmi alqiyamati aw muAAaththibooha AAathaban shadeedan kana thalika fee alkitabi mastooran

Translation: ५८. आणि जेवढ्या देखील वस्त्या आहेत, आम्ही त्यांना कयामतचा दिवस येण्यापूर्वी एकतर उद्‌ध्वस्त करून टाकू किंवा अतिशय सक्त शिक्षा देऊ. हे तर ग्रंथात लिहिले गेले आहे.

17:59

وَمَا مَنَعَنَآ أَن نُّرۡسِلَ بِٱلۡأٓيَٰتِ إِلَّآ أَن كَذَّبَ بِهَا ٱلۡأَوَّلُونَۚ وَءَاتَيۡنَا ثَمُودَ ٱلنَّاقَةَ مُبۡصِرَةٗ فَظَلَمُواْ بِهَاۚ وَمَا نُرۡسِلُ بِٱلۡأٓيَٰتِ إِلَّا تَخۡوِيفٗا ﴿59﴾

Transliteration: Wama manaAAana an nursila bialayati illa an kaththaba biha alawwaloona waatayna thamooda alnnaqata mubsiratan fathalamoo biha wama nursilu bialayati illa takhweefan

Translation: ५९. आणि आम्हाला निशाण्या (चमत्कार) उतरविण्यापासून अडसर केवळ याच गोष्टीचा आहे की पूर्वीच्या लोकांनी या निशाण्यांना खोटे ठरविले आहे. आम्ही समूदला चमत्काराच्या स्वरूपात सांडणी दिली परंतु त्यांनी तिच्यावर अत्याचार केला आम्ही तर लोकांना केवळ धाक दाखविण्याकरिता निशाण्या पाठवितो.

17:60

وَإِذۡ قُلۡنَا لَكَ إِنَّ رَبَّكَ أَحَاطَ بِٱلنَّاسِۚ وَمَا جَعَلۡنَا ٱلرُّءۡيَا ٱلَّتِيٓ أَرَيۡنَٰكَ إِلَّا فِتۡنَةٗ لِّلنَّاسِ وَٱلشَّجَرَةَ ٱلۡمَلۡعُونَةَ فِي ٱلۡقُرۡءَانِۚ وَنُخَوِّفُهُمۡ فَمَا يَزِيدُهُمۡ إِلَّا طُغۡيَٰنٗا كَبِيرٗا ﴿60﴾

Transliteration: Waith qulna laka inna rabbaka ahata bialnnasi wama jaAAalna alrruya allatee araynaka illa fitnatan lilnnasi waalshshajarata almalAAoonata fee alqurani wanukhawwifuhum fama yazeeduhum illa tughyanan kabeeran

Translation: ६०. आणि स्मरण करा, जेव्हा आम्ही तुम्हाला सांगितले की तुमच्या पालनकर्त्याने लोकांना घेरले आहे. आम्ही जे तुम्हाला दाखविले होते, ती लोकांकरिता स्पष्ट परीक्षाच होती आणि त्याचप्रमाणे ते झाड देखील ज्याविषयी कुरआनात तिरस्कार व्यक्त केला गेला आहे. आम्ही त्यांना सचेत करीत आहोत, परंतु अशाने त्यांचे वैर आणखी जास्त वाढत जात आहे.

17:61

وَإِذۡ قُلۡنَا لِلۡمَلَـٰٓئِكَةِ ٱسۡجُدُواْ لِأٓدَمَ فَسَجَدُوٓاْ إِلَّآ إِبۡلِيسَ قَالَ ءَأَسۡجُدُ لِمَنۡ خَلَقۡتَ طِينٗا ﴿61﴾

Transliteration: Waith qulna lilmalaikati osjudoo liadama fasajadoo illa ibleesa qala aasjudu liman khalaqta teenan

Translation: ६१. आणि जेव्हा आम्ही फरिश्त्यांना आदेश दिला की आदमला सजदा करा, तेव्हा इब्लिसखेरीज सर्वांनी सजदा केला. तो म्हणाला, काय मी त्याला सजदा करू, ज्याला तू मातीपासून बनविले आहे.

17:62

قَالَ أَرَءَيۡتَكَ هَٰذَا ٱلَّذِي كَرَّمۡتَ عَلَيَّ لَئِنۡ أَخَّرۡتَنِ إِلَىٰ يَوۡمِ ٱلۡقِيَٰمَةِ لَأَحۡتَنِكَنَّ ذُرِّيَّتَهُۥٓ إِلَّا قَلِيلٗا ﴿62﴾

Transliteration: Qala araaytaka hatha allathee karramta AAalayya lain akhkhartani ila yawmi alqiyamati laahtanikanna thurriyyatahu illa qaleelan

Translation: ६२. ठीक आहे, पण पाहा तू त्याला माझ्यावर श्रेष्ठता तर प्रदान केली आहे, परंतु जर तू मला कयामतपर्यंत संधी देशील तर मी याच्या संततीला, फार कमी लोकांशिवाय आपल्या काबूत करेन.

17:63

قَالَ ٱذۡهَبۡ فَمَن تَبِعَكَ مِنۡهُمۡ فَإِنَّ جَهَنَّمَ جَزَآؤُكُمۡ جَزَآءٗ مَّوۡفُورٗا ﴿63﴾

Transliteration: Qala ithhab faman tabiAAaka minhum fainna jahannama jazaokum jazaan mawfooran

Translation: ६३. (अल्लाहने) आदेश दिला, जा, त्यांच्यापैकी जो कोणी तुझा अनुयायी होईल तर तुम्हा सर्वांची शिक्षा जहन्नम आहे, जो पुरेपूर मोबदला आहे.

17:64

وَٱسۡتَفۡزِزۡ مَنِ ٱسۡتَطَعۡتَ مِنۡهُم بِصَوۡتِكَ وَأَجۡلِبۡ عَلَيۡهِم بِخَيۡلِكَ وَرَجِلِكَ وَشَارِكۡهُمۡ فِي ٱلۡأَمۡوَٰلِ وَٱلۡأَوۡلَٰدِ وَعِدۡهُمۡۚ وَمَا يَعِدُهُمُ ٱلشَّيۡطَٰنُ إِلَّا غُرُورًا ﴿64﴾

Transliteration: Waistafziz mani istataAAta minhum bisawtika waajlib AAalayhim bikhaylika warajlika washarikhum fee alamwali waalawladi waAAidhum wama yaAAiduhumu alshshaytanu illa ghurooran

Translation: ६४. त्यांच्यापैकी तू ज्याला देखील आपल्या बोलण्याने बहकवू शकशील बहकव आणि त्यांच्यावर आपले स्वार आणि प्यादे चढवून आण, आणि त्यांच्या धन आणि संततीमधून आपलाही हिस्सा लाव, आणि त्यांना (खोटे) वचन दे. त्यांच्याशी जेवढी देखील वचने (वायदे) सैतानाचे असतात, सर्वच्या सर्व पूर्ण दगाबाजी आहे.

17:65

إِنَّ عِبَادِي لَيۡسَ لَكَ عَلَيۡهِمۡ سُلۡطَٰنٞۚ وَكَفَىٰ بِرَبِّكَ وَكِيلٗا ﴿65﴾

Transliteration: Inna AAibadee laysa laka AAalayhim sultanun wakafa birabbika wakeelan

Translation: ६५. माझ्या सच्चा दासांवर तुझा कोणताही प्रभाव आणि काबू नाही आणि तुमचा पालनकर्ता मोठा काम बनविणारा पुरेसा आहे.

17:66

رَّبُّكُمُ ٱلَّذِي يُزۡجِي لَكُمُ ٱلۡفُلۡكَ فِي ٱلۡبَحۡرِ لِتَبۡتَغُواْ مِن فَضۡلِهِۦٓۚ إِنَّهُۥ كَانَ بِكُمۡ رَحِيمٗا ﴿66﴾

Transliteration: Rabbukumu allathee yuzjee lakumu alfulka fee albahri litabtaghoo min fadlihi innahu kana bikum raheeman

Translation: ६६. तुमचा पालनकर्ता तो आहे, जो तुमच्यासाठी नदीत नावा चालवितो, यासाठी की तुम्ही त्याच्या कृपेचा शोध घ्यावा. निःसंशय तो तुमच्यावर मोठा दया करणारा आहे.

17:67

وَإِذَا مَسَّكُمُ ٱلضُّرُّ فِي ٱلۡبَحۡرِ ضَلَّ مَن تَدۡعُونَ إِلَّآ إِيَّاهُۖ فَلَمَّا نَجَّىٰكُمۡ إِلَى ٱلۡبَرِّ أَعۡرَضۡتُمۡۚ وَكَانَ ٱلۡإِنسَٰنُ كَفُورًا ﴿67﴾

Transliteration: Waitha massakumu alddurru fee albahri dalla man tadAAoona illa iyyahu falamma najjakum ila albarri aAAradtum wakana alinsanu kafooran

Translation: ६७. आणि समुद्रात संकट कोसळताच, ज्यांना तुम्ही दुआ-प्रार्थना करीत होते, ते सर्व विसरतात, केवळ तोच (अल्लाह) बाकी राहतो, मग जेव्हा तो तुम्हाला खुश्कीकडे सुरक्षित घेऊन येतो, तेव्हा तुम्ही तोंड फिरवून घेता. मनुष्य मोठा कृतघ्न आहे.

17:68

أَفَأَمِنتُمۡ أَن يَخۡسِفَ بِكُمۡ جَانِبَ ٱلۡبَرِّ أَوۡ يُرۡسِلَ عَلَيۡكُمۡ حَاصِبٗا ثُمَّ لَا تَجِدُواْ لَكُمۡ وَكِيلًا ﴿68﴾

Transliteration: Afaamintum an yakhsifa bikum janiba albarri aw yursila AAalaykum hasiban thumma la tajidoo lakum wakeelan

Translation: ६८. तर काय तुम्ही या गोष्टीपासून निर्धास्त झालात की तुम्हाला खुश्कीच्या एखाद्या भूभागात (नेऊन जमिनीत) धसवून टाकावे किंवा तुमच्यावर दगडांचा वर्षाव करणारे भयंकर वादळ पाठवावे, मग स्वतःसाठी तुम्हाला कोणी मित्र व सहाय्यकर्ता आढळणार नाही.

17:69

أَمۡ أَمِنتُمۡ أَن يُعِيدَكُمۡ فِيهِ تَارَةً أُخۡرَىٰ فَيُرۡسِلَ عَلَيۡكُمۡ قَاصِفٗا مِّنَ ٱلرِّيحِ فَيُغۡرِقَكُم بِمَا كَفَرۡتُمۡ ثُمَّ لَا تَجِدُواْ لَكُمۡ عَلَيۡنَا بِهِۦ تَبِيعٗا ﴿69﴾

Transliteration: Am amintum an yuAAeedakum feehi taratan okhra fayursila AAalaykum qasifan mina alrreehi fayughriqakum bima kafartum thumma la tajidoo lakum AAalayna bihi tabeeAAan

Translation: ६९. काय तुम्ही या गोष्टीपासून निर्भय झाला आहात की (अल्लाहने) दुसऱ्यांदा तुम्हाला नदीच्या प्रवासात आणावे आणि तुमच्यावर वेगवान वादळवारे पाठवावेत आणि तुमच्या इन्कारापायी तुम्हाला बुडवावे, मग तुम्हाला स्वतःकरिता, आमच्यावर त्याचा दावा (पाठलाग) करणारा कोणीही आढळणार नाही.

17:70

وَلَقَدۡ كَرَّمۡنَا بَنِيٓ ءَادَمَ وَحَمَلۡنَٰهُمۡ فِي ٱلۡبَرِّ وَٱلۡبَحۡرِ وَرَزَقۡنَٰهُم مِّنَ ٱلطَّيِّبَٰتِ وَفَضَّلۡنَٰهُمۡ عَلَىٰ كَثِيرٖ مِّمَّنۡ خَلَقۡنَا تَفۡضِيلٗا ﴿70﴾

Transliteration: Walaqad karramna banee adama wahamalnahum fee albarri waalbahri warazaqnahum mina alttayyibati wafaddalnahum AAala katheerin mimman khalaqna tafdeelan

Translation: ७०. आणि निःसंशय, आम्ही आदमच्या संततीला मोठी प्रतिष्ठा दिली आणि त्यांना खुश्की आणि पाण्यावर चालणारी वाहने दिली आणि त्यांना पाक साफ वस्तूंपासून आजिविका (अन्न-सामुग्री) प्रदान केली आणि आपल्या बहुतेक निर्मितीवर त्यांना श्रेष्ठता प्रदान केली.

17:71

يَوۡمَ نَدۡعُواْ كُلَّ أُنَاسِۭ بِإِمَٰمِهِمۡۖ فَمَنۡ أُوتِيَ كِتَٰبَهُۥ بِيَمِينِهِۦ فَأُوْلَـٰٓئِكَ يَقۡرَءُونَ كِتَٰبَهُمۡ وَلَا يُظۡلَمُونَ فَتِيلٗا ﴿71﴾

Transliteration: Yawma nadAAoo kulla onasin biimamihim faman ootiya kitabahu biyameenihi faolaika yaqraoona kitabahum wala yuthlamoona fateelan

Translation: ७१. ज्या दिवशी आम्ही प्रत्येक उम्मत (समुदाया) ला त्याच्या पेशव्यांसह बोलावू, मग ज्यांना त्यांचा कर्मलेख उजव्या हातात दिला जाईल ते मोठ्या आनंदाने आपला कर्मलेख वाचू लागतील आणि धाग्याइतका (तीळमात्र) ही अत्याचार त्यांच्यावर केला जाणार नाही.

17:72

وَمَن كَانَ فِي هَٰذِهِۦٓ أَعۡمَىٰ فَهُوَ فِي ٱلۡأٓخِرَةِ أَعۡمَىٰ وَأَضَلُّ سَبِيلٗا ﴿72﴾

Transliteration: Waman kana fee hathihi aAAma fahuwa fee alakhirati aAAma waadallu sabeelan

Translation: ७२. आणि जो कोणी या जगात आंधळा राहिला तो आखिरतमध्येही आंधळा आणि सरळ मार्गापासून दूर भटकलेला राहील.

17:73

وَإِن كَادُواْ لَيَفۡتِنُونَكَ عَنِ ٱلَّذِيٓ أَوۡحَيۡنَآ إِلَيۡكَ لِتَفۡتَرِيَ عَلَيۡنَا غَيۡرَهُۥۖ وَإِذٗا لَّٱتَّخَذُوكَ خَلِيلٗا ﴿73﴾

Transliteration: Wain kadoo layaftinoonaka AAani allathee awhayna ilayka litaftariya AAalayna ghayrahu waithan laittakhathooka khaleelan

Translation: ७३. आणि हे लोक तुम्हाला त्या वहयी (प्रकाशना) पासून, जी आम्ही तुमच्यावर अवतरित केली आहे, हटवू इच्छित होते की तुम्ही तिच्याखेरीज काही इतर गोष्टी आमच्या नावाने रचून घ्याव्यात, मग तर यांनी तुम्हाला आपला दोस्त बनविले असते.

17:74

وَلَوۡلَآ أَن ثَبَّتۡنَٰكَ لَقَدۡ كِدتَّ تَرۡكَنُ إِلَيۡهِمۡ شَيۡـٔٗا قَلِيلًا ﴿74﴾

Transliteration: Walawla an thabbatnaka laqad kidta tarkanu ilayhim shayan qaleelan

Translation: ७४. आणि जर आम्ही तुम्हाला अटळ राखले नसते तर फार शक्य होते की तुम्ही त्यांच्याकडे काही न काही (प्रमाणात) झुकलेच असते.

17:75

إِذٗا لَّأَذَقۡنَٰكَ ضِعۡفَ ٱلۡحَيَوٰةِ وَضِعۡفَ ٱلۡمَمَاتِ ثُمَّ لَا تَجِدُ لَكَ عَلَيۡنَا نَصِيرٗا ﴿75﴾

Transliteration: Ithan laathaqnaka diAAfa alhayati wadiAAfa almamati thumma la tajidu laka AAalayna naseeran

Translation: ७५. मग तर आम्हीही तुम्हाला या जगात दुहेरी सजा दिली असती. आणि दुहेरी मृत्युचीही, या स्थितीत तुम्हाला स्वतःसाठी आमच्या विरोधात कोणताही मदत करणारा आढळला नसता.

17:76

وَإِن كَادُواْ لَيَسۡتَفِزُّونَكَ مِنَ ٱلۡأَرۡضِ لِيُخۡرِجُوكَ مِنۡهَاۖ وَإِذٗا لَّا يَلۡبَثُونَ خِلَٰفَكَ إِلَّا قَلِيلٗا ﴿76﴾

Transliteration: Wain kadoo layastafizzoonaka mina alardi liyukhrijooka minha waithan la yalbathoona khilafaka illa qaleelan

Translation: ७६. आणि हे तर तुमचे पाय या भूमीतून डगमगविण्याच्या तयारीला लागलेच होते की तुम्हाला देशाबाहेर घालवावे, मग हे सुद्धा तुमच्यानंतर फार कमी काळ राहू शकले असते.

17:77

سُنَّةَ مَن قَدۡ أَرۡسَلۡنَا قَبۡلَكَ مِن رُّسُلِنَاۖ وَلَا تَجِدُ لِسُنَّتِنَا تَحۡوِيلًا ﴿77﴾

Transliteration: Sunnata man qad arsalna qablaka min rusulina wala tajidu lisunnatina tahweelan

Translation: ७७. असाच नियम त्यांचा होता, जे तुमच्यापूर्वी पैगंबर आम्ही पाठविले, आणि तुम्हाला आमच्या नियमांमध्ये कधीही बदल दिसून येणार नाही.

17:78

أَقِمِ ٱلصَّلَوٰةَ لِدُلُوكِ ٱلشَّمۡسِ إِلَىٰ غَسَقِ ٱلَّيۡلِ وَقُرۡءَانَ ٱلۡفَجۡرِۖ إِنَّ قُرۡءَانَ ٱلۡفَجۡرِ كَانَ مَشۡهُودٗا ﴿78﴾

Transliteration: Aqimi alssalata lidulooki alshshamsi ila ghasaqi allayli waqurana alfajri inna qurana alfajri kana mashhoodan

Translation: ७८. सूर्यास्तापासून रात्रीचा अंधार होईपर्यंत नमाज कायम राखा आणि प्रातःकाळी (फज्रच्या वेळी) कुरआनचे पठणही, निःसंशय प्रातःकाळी कुरआन पठण करणे हजर केले गेले आहे.

17:79

وَمِنَ ٱلَّيۡلِ فَتَهَجَّدۡ بِهِۦ نَافِلَةٗ لَّكَ عَسَىٰٓ أَن يَبۡعَثَكَ رَبُّكَ مَقَامٗا مَّحۡمُودٗا ﴿79﴾

Transliteration: Wamina allayli fatahajjad bihi nafilatan laka AAasa an yabAAathaka rabbuka maqaman mahmoodan

Translation: ७९. आणि रात्रीच्या काही भागात तहज्जूद (च्या नमाजमध्ये कुरआन) पढत जात. ही अधिकता तुमच्यासाठी आहे. लवकरच तुमचा पालनकर्ता तुम्हाला महमूद नावाच्या (प्रशंसापूर्ण) स्थानावर उभा करेल.

17:80

وَقُل رَّبِّ أَدۡخِلۡنِي مُدۡخَلَ صِدۡقٖ وَأَخۡرِجۡنِي مُخۡرَجَ صِدۡقٖ وَٱجۡعَل لِّي مِن لَّدُنكَ سُلۡطَٰنٗا نَّصِيرٗا ﴿80﴾

Transliteration: Waqul rabbi adkhilnee mudkhala sidqin waakhrijnee mukhraja sidqin waijAAal lee min ladunka sultanan naseeran

Translation: ८०. आणि दुआ-प्रार्थना करीत राहा की हे माझ्या पालनकर्त्या! मला जिथेही न्यायचे असेल, चांगल्या प्रकारे ने आणि जिथूनही बाहेर काढायचे असेल चांगल्या प्रकारे काढआणि माझ्यासाठी आपल्या जवळून वर्चस्व आणि मदत निश्चित कर.

17:81

وَقُلۡ جَآءَ ٱلۡحَقُّ وَزَهَقَ ٱلۡبَٰطِلُۚ إِنَّ ٱلۡبَٰطِلَ كَانَ زَهُوقٗا ﴿81﴾

Transliteration: Waqul jaa alhaqqu wazahaqa albatilu inna albatila kana zahooqan

Translation: ८१. आणि या गोष्टीचे ऐलान करा की, सत्य येऊन पोहोचले आणि असत्य मिटले. निःसंशय असत्य मिटण्याच्याच योग्य होते.

17:82

وَنُنَزِّلُ مِنَ ٱلۡقُرۡءَانِ مَا هُوَ شِفَآءٞ وَرَحۡمَةٞ لِّلۡمُؤۡمِنِينَ وَلَا يَزِيدُ ٱلظَّـٰلِمِينَ إِلَّا خَسَارٗا ﴿82﴾

Transliteration: Wanunazzilu mina alqurani ma huwa shifaon warahmatun lilmumineena wala yazeedu alththalimeena illa khasaran

Translation: ८२. आणि हा कुरआन जो आम्ही अवतरित करीत आहोत, ईमान राखणाऱ्यांसाठी रोगमुक्ती, स्वास्थ्य आणि दया-कृपा आहे, परंतु अत्याचारींसाठी नुकसानाशिवाय कसलीही वाढ होत नाही.

17:83

وَإِذَآ أَنۡعَمۡنَا عَلَى ٱلۡإِنسَٰنِ أَعۡرَضَ وَنَـَٔا بِجَانِبِهِۦ وَإِذَا مَسَّهُ ٱلشَّرُّ كَانَ يَـُٔوسٗا ﴿83﴾

Transliteration: Waitha anAAamna AAala alinsani aAArada wanaa bijanibihi waitha massahu alshsharru kana yaoosan

Translation: ८३. आणि जेव्हा देखील माणसाला आम्ही आपली कृपा-देणगी प्रदान करतो, तेव्हा तो तोंड फिरवितो आणि कुशी बदलतो आणि जेव्हा देखील त्याला दुःख पोहोचते तेव्हा तो निराश होतो.

17:84

قُلۡ كُلّٞ يَعۡمَلُ عَلَىٰ شَاكِلَتِهِۦ فَرَبُّكُمۡ أَعۡلَمُ بِمَنۡ هُوَ أَهۡدَىٰ سَبِيلٗا ﴿84﴾

Transliteration: Qul kullun yaAAmalu AAala shakilatihi farabbukum aAAlamu biman huwa ahda sabeelan

Translation: ८४. सांगा की प्रत्येक मनुष्य आपल्या पद्धतीनुसार कार्य करतो. जे पूर्णतः मार्गदर्शनावर आहेत, त्यांना तुमचा पालनकर्ताच चांगल्या प्रकारे जाणतो.

17:85

وَيَسۡـَٔلُونَكَ عَنِ ٱلرُّوحِۖ قُلِ ٱلرُّوحُ مِنۡ أَمۡرِ رَبِّي وَمَآ أُوتِيتُم مِّنَ ٱلۡعِلۡمِ إِلَّا قَلِيلٗا ﴿85﴾

Transliteration: Wayasaloonaka AAani alrroohi quli alrroohu min amri rabbee wama ooteetum mina alAAilmi illa qaleelan

Translation: ८५. आणि हे लोक तुम्हाला आत्म्याविषयी विचारतात. (तुम्ही त्यांना) उत्तर द्या की आत्मा माझ्या पालनकर्त्या (अल्लाह) च्या हुकूमाने आहे. आणि तुम्हाला जे ज्ञान दिले गेले आहे ते फारच कमी आहे.१

17:86

وَلَئِن شِئۡنَا لَنَذۡهَبَنَّ بِٱلَّذِيٓ أَوۡحَيۡنَآ إِلَيۡكَ ثُمَّ لَا تَجِدُ لَكَ بِهِۦ عَلَيۡنَا وَكِيلًا ﴿86﴾

Transliteration: Walain shina lanathhabanna biallathee awhayna ilayka thumma la tajidu laka bihi AAalayna wakeelan

Translation: ८६. आणि जर आम्ही इच्छिले तर जी वहयी (प्रकाशना) तुमच्याकडे आम्ही अवतरित केली आहे, सर्व परत घेऊ, मग तुम्हाला त्याच्यासाठी आमच्यासमोर कोणीही हिमायत करणारा लाभू शकणार नाही.

17:87

إِلَّا رَحۡمَةٗ مِّن رَّبِّكَۚ إِنَّ فَضۡلَهُۥ كَانَ عَلَيۡكَ كَبِيرٗا ﴿87﴾

Transliteration: Illa rahmatan min rabbika inna fadlahu kana AAalayka kabeeran

Translation: ८७. तुमच्या पालनकर्त्याच्या दयेखेरीज. निःसंशय तुमच्यावर त्याची मोठी कृपा आहे.

17:88

قُل لَّئِنِ ٱجۡتَمَعَتِ ٱلۡإِنسُ وَٱلۡجِنُّ عَلَىٰٓ أَن يَأۡتُواْ بِمِثۡلِ هَٰذَا ٱلۡقُرۡءَانِ لَا يَأۡتُونَ بِمِثۡلِهِۦ وَلَوۡ كَانَ بَعۡضُهُمۡ لِبَعۡضٖ ظَهِيرٗا ﴿88﴾

Transliteration: Qul laini ijtamaAAati alinsu waaljinnu AAala an yatoo bimithli hatha alqurani la yatoona bimithlihi walaw kana baAAduhum libaAAdin thaheeran

Translation: ८८. सांगा की जर समस्त मानव आणि जिन्न मिळून या कुरआनासारखा (ग्रंथ) आणू इच्छितील तर त्या सर्वांच्याकडून याचे उदाहरण आणणे अशक्य आहे, मग ते आपसात एकमेकांचे सहाय्यक बनले तरीही.

17:89

وَلَقَدۡ صَرَّفۡنَا لِلنَّاسِ فِي هَٰذَا ٱلۡقُرۡءَانِ مِن كُلِّ مَثَلٖ فَأَبَىٰٓ أَكۡثَرُ ٱلنَّاسِ إِلَّا كُفُورٗا ﴿89﴾

Transliteration: Walaqad sarrafna lilnnasi fee hatha alqurani min kulli mathalin faaba aktharu alnnasi illa kufooran

Translation: ८९. आणि आम्ही तर या कुरआनात लोकांच्या समजण्याकरिता अशा प्रकारे सर्व उदाहरणे सांगितली आहेत, परंतु बहुतेक लोक कृतघ्नपणा दाखविणे थांबवत नाहीत.

17:90

وَقَالُواْ لَن نُّؤۡمِنَ لَكَ حَتَّىٰ تَفۡجُرَ لَنَا مِنَ ٱلۡأَرۡضِ يَنۢبُوعًا ﴿90﴾

Transliteration: Waqaloo lan numina laka hatta tafjura lana mina alardi yanbooAAan

Translation: ९०. आणि ते म्हणाले, आम्ही तुमच्यावर कधीही ईमान राखणार नाही, जोपर्यंत तुम्ही आमच्यासाठी जमिनीतून पाण्याचा झरा काढून दाखवत नाही.

17:91

أَوۡ تَكُونَ لَكَ جَنَّةٞ مِّن نَّخِيلٖ وَعِنَبٖ فَتُفَجِّرَ ٱلۡأَنۡهَٰرَ خِلَٰلَهَا تَفۡجِيرًا ﴿91﴾

Transliteration: Aw takoona laka jannatun min nakheelin waAAinabin fatufajjira alanhara khilalaha tafjeeran

Translation: ९१. अथवा स्वतः तुमच्यासाठी एखादा बाग असावा खजुरांचा आणि द्राक्षांचा आणि त्यांच्या दरम्यान तुम्ही अनेक वाहते जलप्रवाह काढून दाखवावेत.

17:92

أَوۡ تُسۡقِطَ ٱلسَّمَآءَ كَمَا زَعَمۡتَ عَلَيۡنَا كِسَفًا أَوۡ تَأۡتِيَ بِٱللَّهِ وَٱلۡمَلَـٰٓئِكَةِ قَبِيلًا ﴿92﴾

Transliteration: Aw tusqita alssamaa kama zaAAamta AAalayna kisafan aw tatiya biAllahi waalmalaikati qabeelan

Translation: ९२. किंवा तुम्ही आकाशाला आमच्यावर तुकडे तुकडे करून पाडावे, जसा तुमचा विचार आहे अथवा तुम्ही स्वतः अल्लाहला आणि फरिश्त्यांना आमच्यासमोर आणून उभे करावे.

17:93

أَوۡ يَكُونَ لَكَ بَيۡتٞ مِّن زُخۡرُفٍ أَوۡ تَرۡقَىٰ فِي ٱلسَّمَآءِ وَلَن نُّؤۡمِنَ لِرُقِيِّكَ حَتَّىٰ تُنَزِّلَ عَلَيۡنَا كِتَٰبٗا نَّقۡرَؤُهُۥۗ قُلۡ سُبۡحَانَ رَبِّي هَلۡ كُنتُ إِلَّا بَشَرٗا رَّسُولٗا ﴿93﴾

Transliteration: Aw yakoona laka baytun min zukhrufin aw tarqa fee alssamai walan numina liruqiyyika hatta tunazzila AAalayna kitaban naqraohu qul subhana rabbee hal kuntu illa basharan rasoolan

Translation: ९३. अथवा स्वतः तुमच्यासाठी एखादे सोन्याचे घर असावे किंवा तुम्ही आकाशात चढून जावे आणि आम्ही तर तुमच्या चढून जाण्याचाही तोपर्यंत विश्वास करणार नाही, जोपर्यंत तुम्ही आमच्यावर एखादा ग्रंथ अवतरित करत नाही, जो आम्ही स्वतः वाचून घ्यावा. तुम्ही उत्तर द्या की माझा पालनकर्ता मोठा पवित्र आहे. मी तर एक मानव आहे, जो रसूल (पैगंबर) बनवून पाठविला गेलो आहे.

17:94

وَمَا مَنَعَ ٱلنَّاسَ أَن يُؤۡمِنُوٓاْ إِذۡ جَآءَهُمُ ٱلۡهُدَىٰٓ إِلَّآ أَن قَالُوٓاْ أَبَعَثَ ٱللَّهُ بَشَرٗا رَّسُولٗا ﴿94﴾

Transliteration: Wama manaAAa alnnasa an yuminoo ith jaahumu alhuda illa an qaloo abaAAatha Allahu basharan rasoolan

Translation: ९४. आणि लोकांजवळ मार्गदर्शन येऊन पोहोचल्यानंतर ईमान राखण्यापासून रोखणारी केवळ हीच गोष्ट राहिली की ते म्हणाले, काय अल्लाहने एका माणसालाच रसूल (पैगंबर) बनवून पाठविले?

17:95

قُل لَّوۡ كَانَ فِي ٱلۡأَرۡضِ مَلَـٰٓئِكَةٞ يَمۡشُونَ مُطۡمَئِنِّينَ لَنَزَّلۡنَا عَلَيۡهِم مِّنَ ٱلسَّمَآءِ مَلَكٗا رَّسُولٗا ﴿95﴾

Transliteration: Qul law kana fee alardi malaikatun yamshoona mutmainneena lanazzalna AAalayhim mina alssamai malakan rasoolan

Translation: ९५. (तुम्ही) सांगा, जर धरतीवर फरिश्ते चालत फिरत असते आणि इथे वास्तव्य करणारे राहिले असते तर मग आम्हीही त्यांच्याजवळ एखाद्या आस्मानी फरिश्त्यालाच रसूल बनवून पाठविले असते.

17:96

قُلۡ كَفَىٰ بِٱللَّهِ شَهِيدَۢا بَيۡنِي وَبَيۡنَكُمۡۚ إِنَّهُۥ كَانَ بِعِبَادِهِۦ خَبِيرَۢا بَصِيرٗا ﴿96﴾

Transliteration: Qul kafa biAllahi shaheedan baynee wabaynakum innahu kana biAAibadihi khabeeran baseeran

Translation: ९६. सांगा, माझ्या आणि तुमच्या दरम्यान अल्लाहचे साक्षी असणे पुरेसे आहे तो आपल्या दासांना चांगल्या प्रकारे जाणून आहे आणि चांगल्या प्रकारे पाहणारा आहे.

17:97

وَمَن يَهۡدِ ٱللَّهُ فَهُوَ ٱلۡمُهۡتَدِۖ وَمَن يُضۡلِلۡ فَلَن تَجِدَ لَهُمۡ أَوۡلِيَآءَ مِن دُونِهِۦۖ وَنَحۡشُرُهُمۡ يَوۡمَ ٱلۡقِيَٰمَةِ عَلَىٰ وُجُوهِهِمۡ عُمۡيٗا وَبُكۡمٗا وَصُمّٗاۖ مَّأۡوَىٰهُمۡ جَهَنَّمُۖ كُلَّمَا خَبَتۡ زِدۡنَٰهُمۡ سَعِيرٗا ﴿97﴾

Transliteration: Waman yahdi Allahu fahuwa almuhtadi waman yudlil falan tajida lahum awliyaa min doonihi wanahshuruhum yawma alqiyamati AAala wujoohihim AAumyan wabukman wasumman mawahum jahannamu kullama khabat zidnahum saAAeeran

Translation: ९७. आणि अल्लाह ज्याला मार्ग दाखविल, तो मार्गदर्शन लाभलेला आहे आणि ज्याला तो पथभ्रष्ट करील तर असंभव आहे की तुम्हाला त्याचा मित्र, त्याच्याखेरीज दुसरा कोणी आढळेल, अशा लोकांना आम्ही कयामतच्या दिवशी तोंडघशी पाडून अशा अवस्थेत जमा करू की ते आंधळे, मुके आणि बहिरे असतील. त्यांचे ठिकाण जहन्नम असेल, जेव्हा ती (आग) थोडी सुद्धा मंद पडू लागेल तर तिला आम्ही त्यांच्यासाठी आणखी भडकावून देऊ.

17:98

ذَٰلِكَ جَزَآؤُهُم بِأَنَّهُمۡ كَفَرُواْ بِـَٔايَٰتِنَا وَقَالُوٓاْ أَءِذَا كُنَّا عِظَٰمٗا وَرُفَٰتًا أَءِنَّا لَمَبۡعُوثُونَ خَلۡقٗا جَدِيدًا ﴿98﴾

Transliteration: Thalika jazaohum biannahum kafaroo biayatina waqaloo aitha kunna AAithaman warufatan ainna lamabAAoothoona khalqan jadeedan

Translation: ९८. हा सर्व आमच्या निशाण्यांचा इन्कार करण्याचा आणि हे सांगण्याचा परिणाम आहे की काय जेव्हा आम्ही राख आणि कण कण होऊन जाऊ, मग आम्हाला नव्याने निर्माण करून उठवून उभे केले जाईल?

17:99

أَوَلَمۡ يَرَوۡاْ أَنَّ ٱللَّهَ ٱلَّذِي خَلَقَ ٱلسَّمَٰوَٰتِ وَٱلۡأَرۡضَ قَادِرٌ عَلَىٰٓ أَن يَخۡلُقَ مِثۡلَهُمۡ وَجَعَلَ لَهُمۡ أَجَلٗا لَّا رَيۡبَ فِيهِ فَأَبَى ٱلظَّـٰلِمُونَ إِلَّا كُفُورٗا ﴿99﴾

Transliteration: Awalam yaraw anna Allaha allathee khalaqa alssamawati waalarda qadirun AAala an yakhluqa mithlahum wajaAAala lahum ajalan la rayba feehi faaba alththalimoona illa kufooran

Translation: ९९. काय त्यांनी या गोष्टीकडे लक्ष दिले नाही की ज्या अल्लाहने आकाश आणि धरतीला निर्माण केले, तो त्यांच्यासारख्यांना निर्माण करण्याचे पूर्ण सामर्थ्य बाळगतो, त्यानेच त्यांच्यासाठी एक अशी वेळ निश्चित केली आहे, जिच्याबाबत काही शंका नाही, परंतु अत्याचारी लोक कृतघ्न बनल्याविना राहत नाही.

17:100

قُل لَّوۡ أَنتُمۡ تَمۡلِكُونَ خَزَآئِنَ رَحۡمَةِ رَبِّيٓ إِذٗا لَّأَمۡسَكۡتُمۡ خَشۡيَةَ ٱلۡإِنفَاقِۚ وَكَانَ ٱلۡإِنسَٰنُ قَتُورٗا ﴿100﴾

Transliteration: Qul law antum tamlikoona khazaina rahmati rabbee ithan laamsaktum khashyata alinfaqi wakana alinsanu qatooran

Translation: १००. त्यांना सांगा की (जर समजा) जर तुम्ही माझ्या पालनकर्त्याच्या दया कृपेच्या खजिन्याचे मालक बनले असते तर तुम्ही त्या वेळीही तो खर्च होईल या भीतीने त्यात कंजूसपणा केला असता आणि मनुष्य आहेच मोठा कोत्या मनाचा!

17:101

وَلَقَدۡ ءَاتَيۡنَا مُوسَىٰ تِسۡعَ ءَايَٰتِۭ بَيِّنَٰتٖۖ فَسۡـَٔلۡ بَنِيٓ إِسۡرَـٰٓءِيلَ إِذۡ جَآءَهُمۡ فَقَالَ لَهُۥ فِرۡعَوۡنُ إِنِّي لَأَظُنُّكَ يَٰمُوسَىٰ مَسۡحُورٗا ﴿101﴾

Transliteration: Walaqad atayna moosa tisAAa ayatin bayyinatin faisal banee israeela ith jaahum faqala lahu firAAawnu innee laathunnuka ya moosa mashooran

Translation: १०१. आणि आम्ही मूसाला नऊ मोजिजे (अल्लाहप्रदत्त चमत्कार) अगदी साफ साफ प्रदान केले, तू स्वतः इस्राईलच्या संततीला विचार, जेव्हा ते त्यांच्याजवळ तेव्हा पोहोचले फिरऔन म्हणाला, हे मूसा! माझ्या मते तुझ्यावर जादूटोणा केला गेला आहे.

17:102

قَالَ لَقَدۡ عَلِمۡتَ مَآ أَنزَلَ هَـٰٓؤُلَآءِ إِلَّا رَبُّ ٱلسَّمَٰوَٰتِ وَٱلۡأَرۡضِ بَصَآئِرَ وَإِنِّي لَأَظُنُّكَ يَٰفِرۡعَوۡنُ مَثۡبُورٗا ﴿102﴾

Transliteration: Qala laqad AAalimta ma anzala haolai illa rabbu alssamawati waalardi basaira wainnee laathunnuka ya firAAawnu mathbooran

Translation: १०२. (मूसाने) उत्तर दिले, हे मला माहीत झाले आहे की आकाशांच्या आणि धरतीच्या पालनकर्त्यानेच हे चमत्कार दाखविण्यासाठी व समजाविण्यासाठी अवतरित केले आहेत, हे फिरऔन! मला तर वाटते की तू नक्कीच नष्ट केला गेला आहे.

17:103

فَأَرَادَ أَن يَسۡتَفِزَّهُم مِّنَ ٱلۡأَرۡضِ فَأَغۡرَقۡنَٰهُ وَمَن مَّعَهُۥ جَمِيعٗا ﴿103﴾

Transliteration: Faarada an yastafizzahum mina alardi faaghraqnahu waman maAAahu jameeAAan

Translation: १०३. शेवटी फिरऔनने पक्का इरादा केला की त्यांना भूमीतूनच काढून फेकावे, तेव्हा आम्ही स्वतः त्याला आणि त्याच्या सर्व साथीदारांना बुडवून टाकले.

17:104

وَقُلۡنَا مِنۢ بَعۡدِهِۦ لِبَنِيٓ إِسۡرَـٰٓءِيلَ ٱسۡكُنُواْ ٱلۡأَرۡضَ فَإِذَا جَآءَ وَعۡدُ ٱلۡأٓخِرَةِ جِئۡنَا بِكُمۡ لَفِيفٗا ﴿104﴾

Transliteration: Waqulna min baAAdihi libanee israeela oskunoo alarda faitha jaa waAAdu alakhirati jina bikum lafeefan

Translation: १०४. आणि त्यानंतर आम्ही इस्राईलच्या पुत्रांना फर्माविले की त्या भूमीवर वास्तव्य करा, मात्र जेव्हा आखिरतचा वायदा येईल तेव्हा आम्ही तुम्हा सर्वांना एकत्रित करून नेऊ.

17:105

وَبِٱلۡحَقِّ أَنزَلۡنَٰهُ وَبِٱلۡحَقِّ نَزَلَۗ وَمَآ أَرۡسَلۡنَٰكَ إِلَّا مُبَشِّرٗا وَنَذِيرٗا ﴿105﴾

Transliteration: Wabialhaqqi anzalnahu wabialhaqqi nazala wama arsalnaka illa mubashshiran wanatheeran

Translation: १०५. आणि आम्ही या (कुरआना) ला सत्यासह अवतरित केले आणि हा देखील सत्यासह अवतरित झाला आणि आम्ही तुम्हाला केवळ खूशखबर देणारा आणि सचेत करणारा बनवून पाठविले आहे.

17:106

وَقُرۡءَانٗا فَرَقۡنَٰهُ لِتَقۡرَأَهُۥ عَلَى ٱلنَّاسِ عَلَىٰ مُكۡثٖ وَنَزَّلۡنَٰهُ تَنزِيلٗا ﴿106﴾

Transliteration: Waquranan faraqnahu litaqraahu AAala alnnasi AAala mukthin wanazzalnahu tanzeelan

Translation: १०६. आणि कुरआनाला आम्ही थोडे थोडे करून अशासाठी उतरविले आहे की तुम्ही वेळ मिळेल त्यानुसार लोकांना ऐकवावे आणि आम्ही स्वतःदेखील याला थोडे थोडे करून उतरविले.

17:107

قُلۡ ءَامِنُواْ بِهِۦٓ أَوۡ لَا تُؤۡمِنُوٓاْۚ إِنَّ ٱلَّذِينَ أُوتُواْ ٱلۡعِلۡمَ مِن قَبۡلِهِۦٓ إِذَا يُتۡلَىٰ عَلَيۡهِمۡ يَخِرُّونَۤ لِلۡأَذۡقَانِۤ سُجَّدٗاۤ ﴿107﴾

Transliteration: Qul aminoo bihi aw la tuminoo inna allatheena ootoo alAAilma min qablihi itha yutla AAalayhim yakhirroona lilathqani sujjadan

Translation: १०७. तुम्ही सांगा, तुम्ही यावर ईमान राखा किंवा न राखा, ज्यांना याच्यापूर्वी ज्ञान दिले गेले आहे, त्यांच्याजवळ जेव्हा देखील याचे पठण केले जाते, तेव्हा ते माथा टेकून सजदा करू लागतात.

17:108

وَيَقُولُونَ سُبۡحَٰنَ رَبِّنَآ إِن كَانَ وَعۡدُ رَبِّنَا لَمَفۡعُولٗا ﴿108﴾

Transliteration: Wayaqooloona subhana rabbina in kana waAAdu rabbina lamafAAoolan

Translation: १०८. आणि म्हणतात की आमचा पालनकर्ता पवित्र आहे, आमच्या पालनकर्त्याचा वायदा निश्चितच पूर्ण होणार आहे.

17:109

وَيَخِرُّونَ لِلۡأَذۡقَانِ يَبۡكُونَ وَيَزِيدُهُمۡ خُشُوعٗا۩ ﴿109﴾

Transliteration: Wayakhirroona lilathqani yabkoona wayazeeduhum khushooAAan

Translation: १०९. आणि ते माथा टेकून रडत रडत सजद्याच्या अवस्थेत खाली पडतात आणि हा कुरआन त्यांची नरमी आणि नम्रता आणखी जास्त वाढवितो.

17:110

قُلِ ٱدۡعُواْ ٱللَّهَ أَوِ ٱدۡعُواْ ٱلرَّحۡمَٰنَۖ أَيّٗا مَّا تَدۡعُواْ فَلَهُ ٱلۡأَسۡمَآءُ ٱلۡحُسۡنَىٰۚ وَلَا تَجۡهَرۡ بِصَلَاتِكَ وَلَا تُخَافِتۡ بِهَا وَٱبۡتَغِ بَيۡنَ ذَٰلِكَ سَبِيلٗا ﴿110﴾

Transliteration: Quli odAAoo Allaha awi odAAoo alrrahmana ayyan ma tadAAoo falahu alasmao alhusna wala tajhar bisalatika wala tukhafit biha waibtaghi bayna thalika sabeelan

Translation: ११०. तुम्ही सांगा की अल्लाहला अल्लाह म्हणून पुकारा आणि रहमान म्हणून, ज्या नावाने देखील पुकारा सर्व शुभ नामे त्याचीच आहेत. ना तुम्ही आपली नमाज फार उंच स्वरात पढत जा आणि ना अगदी हळू स्वरात किंबहुना यांच्या मधला मार्ग शोधा.

17:111

وَقُلِ ٱلۡحَمۡدُ لِلَّهِ ٱلَّذِي لَمۡ يَتَّخِذۡ وَلَدٗا وَلَمۡ يَكُن لَّهُۥ شَرِيكٞ فِي ٱلۡمُلۡكِ وَلَمۡ يَكُن لَّهُۥ وَلِيّٞ مِّنَ ٱلذُّلِّۖ وَكَبِّرۡهُ تَكۡبِيرَۢا ﴿111﴾

Transliteration: Waquli alhamdu lillahi allathee lam yattakhith waladan walam yakun lahu shareekun fee almulki walam yakun lahu waliyyun mina alththulli wakabbirhu takbeeran

Translation: १११. आणि सांगा, समस्त स्तुती- प्रशंसा अल्लाहकरिताच आहे, जो ना संतती बाळगतो आणि ना आपल्या राज्यसत्तेत दुसऱ्या कोणाला भागीदार ठेवतो, ना तो असा कमजोर आहे की त्याचा कोणी सहाय्यक असावा आणि तुम्ही त्याची परिपूर्ण महिमा वर्णन करण्यात मग्न राहा.

Transliteration source: English Transliteration by Tanzil. Used under Tanzil's non-commercial terms; see the source and latest updates at Tanzil. Tanzil translation download