quranm◉

Surah Ad-Dukhan transliteration

◉ सूरह · ∞

44:1

حمٓ ﴿1﴾

Transliteration: Hameem

Translation: १. हा. मीम.

44:2

وَٱلۡكِتَٰبِ ٱلۡمُبِينِ ﴿2﴾

Transliteration: Waalkitabi almubeeni

Translation: २. शपथ आहे या स्पष्ट ग्रंथाची.

44:3

إِنَّآ أَنزَلۡنَٰهُ فِي لَيۡلَةٖ مُّبَٰرَكَةٍۚ إِنَّا كُنَّا مُنذِرِينَ ﴿3﴾

Transliteration: Inna anzalnahu fee laylatin mubarakatin inna kunna munthireena

Translation: ३. निःसंशय, आम्ही या ग्रंथाला एका शुभरात्रीत१ अवतरित केले आहे. निःसंशय, आम्ही अवगत करून देणारे आहोत.

44:4

فِيهَا يُفۡرَقُ كُلُّ أَمۡرٍ حَكِيمٍ ﴿4﴾

Transliteration: Feeha yufraqu kullu amrin hakeemin

Translation: ४. त्याच रात्रीत प्रत्येक महत्त्वपूर्ण कार्याचा निर्णय घेतला जातो.

44:5

أَمۡرٗا مِّنۡ عِندِنَآۚ إِنَّا كُنَّا مُرۡسِلِينَ ﴿5﴾

Transliteration: Amran min AAindina inna kunna mursileena

Translation: ५. आमच्याकडून एक फर्मान बनून आम्हीच आहोत रसूल (संदेशवाहक) बनवून पाठविणारे.

44:6

رَحۡمَةٗ مِّن رَّبِّكَۚ إِنَّهُۥ هُوَ ٱلسَّمِيعُ ٱلۡعَلِيمُ ﴿6﴾

Transliteration: Rahmatan min rabbika innahu huwa alssameeAAu alAAaleemu

Translation: ६. तुमच्या पालनकर्त्याच्या कृपेने, तोच आहे ऐकणारा आणि जाणणारा.

44:7

رَبِّ ٱلسَّمَٰوَٰتِ وَٱلۡأَرۡضِ وَمَا بَيۡنَهُمَآۖ إِن كُنتُم مُّوقِنِينَ ﴿7﴾

Transliteration: Rabbi alssamawati waalardi wama baynahuma in kuntum mooqineena

Translation: ७. जो आकाशांचा आणि धरतीचा आणि त्यांच्या दरम्यान जे काही आहे त्या सर्वांचा स्वामी आहे, जर तुम्ही विश्वास राखणारे असाल.

44:8

لَآ إِلَٰهَ إِلَّا هُوَ يُحۡيِۦ وَيُمِيتُۖ رَبُّكُمۡ وَرَبُّ ءَابَآئِكُمُ ٱلۡأَوَّلِينَ ﴿8﴾

Transliteration: La ilaha illa huwa yuhyee wayumeetu rabbukum warabbu abaikumu alawwaleena

Translation: ८. त्याच्याशिवाय दुसरा कोणीही उपासना करण्यास पात्र नाही. तोच जिवंत करतो आणि मारतो. तोच तुमचा आणि तुमच्यापूर्वी होऊन गेलेल्या पूर्वजांचा स्वामी व पालनकर्ता आहे.

44:9

بَلۡ هُمۡ فِي شَكّٖ يَلۡعَبُونَ ﴿9﴾

Transliteration: Bal hum fee shakkin yalAAaboona

Translation: ९. किंबहुना ते संशयात पडून खेळत आहेत.

44:10

فَٱرۡتَقِبۡ يَوۡمَ تَأۡتِي ٱلسَّمَآءُ بِدُخَانٖ مُّبِينٖ ﴿10﴾

Transliteration: Fairtaqib yawma tatee alssamao bidukhanin mubeenin

Translation: १०. तुम्ही त्या दिवसाच्या प्रतीक्षेत राहा, जेव्हा आकाश उघड स्वरूपाचा धूर आणील.

44:11

يَغۡشَى ٱلنَّاسَۖ هَٰذَا عَذَابٌ أَلِيمٞ ﴿11﴾

Transliteration: Yaghsha alnnasa hatha AAathabun aleemun

Translation: ११. जो लोकांना घेरा टाकील. ही मोठी दुःखदायक शिक्षा - यातना आहे.

44:12

رَّبَّنَا ٱكۡشِفۡ عَنَّا ٱلۡعَذَابَ إِنَّا مُؤۡمِنُونَ ﴿12﴾

Transliteration: Rabbana ikshif AAanna alAAathaba inna muminoona

Translation: १२. (म्हणतील की) हे आमच्या पालनकर्त्या! हा अज़ाब (शिक्षा - यातना) आमच्यापासून दूर कर, आम्ही ईमान स्वीकारले.

44:13

أَنَّىٰ لَهُمُ ٱلذِّكۡرَىٰ وَقَدۡ جَآءَهُمۡ رَسُولٞ مُّبِينٞ ﴿13﴾

Transliteration: Anna lahumu alththikra waqad jaahum rasoolun mubeenun

Translation: १३. त्यांच्यासाठी आता उपदेश कोठे आहे? स्पष्टरित्या निवेदन करणारे पैगंबर त्यांच्याजवळ (केव्हाच) येऊन गेलेत.

44:14

ثُمَّ تَوَلَّوۡاْ عَنۡهُ وَقَالُواْ مُعَلَّمٞ مَّجۡنُونٌ ﴿14﴾

Transliteration: Thumma tawallaw AAanhu waqaloo muAAallamun majnoonun

Translation: १४. तरीही त्यांनी त्यांच्याकडून तोंड फिरविले आणि सांगितले की हा तर शिकविलेला वेडा आहे.

44:15

إِنَّا كَاشِفُواْ ٱلۡعَذَابِ قَلِيلًاۚ إِنَّكُمۡ عَآئِدُونَ ﴿15﴾

Transliteration: Inna kashifoo alAAathabi qaleelan innakum AAaidoona

Translation: १५. आम्ही शिक्षा - यातनेला थोडेसे दूरही करू तरी तुम्ही परत पुन्हा आपल्या त्याच अवस्थेत याल.

44:16

يَوۡمَ نَبۡطِشُ ٱلۡبَطۡشَةَ ٱلۡكُبۡرَىٰٓ إِنَّا مُنتَقِمُونَ ﴿16﴾

Transliteration: Yawma nabtishu albatshata alkubra inna muntaqimoona

Translation: १६. ज्या दिवशी आम्ही मोठ्या सक्त पकडीत धरू, निश्चितच आम्ही प्रतिशोध (सूड) घेणार आहोत.

44:17

وَلَقَدۡ فَتَنَّا قَبۡلَهُمۡ قَوۡمَ فِرۡعَوۡنَ وَجَآءَهُمۡ رَسُولٞ كَرِيمٌ ﴿17﴾

Transliteration: Walaqad fatanna qablahum qawma firAAawna wajaahum rasoolun kareemun

Translation: १७. आणि निःसंशय, आम्ही यापूर्वी फिरऔनच्या जनसमूहाची (ही) परीक्षा घेतली आहे ज्यांच्याजवळ (अल्लाहचा) प्रतिष्ठासंपन्न रसूल (पैगंबर) आला.

44:18

أَنۡ أَدُّوٓاْ إِلَيَّ عِبَادَ ٱللَّهِۖ إِنِّي لَكُمۡ رَسُولٌ أَمِينٞ ﴿18﴾

Transliteration: An addoo ilayya AAibada Allahi innee lakum rasoolun ameenun

Translation: १८. की अल्लाहच्या दासांना माझ्या हवाली करा, विश्वास राखा की मी तुमच्यासाठी विश्वस्त पैगंबर आहे.

44:19

وَأَن لَّا تَعۡلُواْ عَلَى ٱللَّهِۖ إِنِّيٓ ءَاتِيكُم بِسُلۡطَٰنٖ مُّبِينٖ ﴿19﴾

Transliteration: Waan la taAAloo AAala Allahi innee ateekum bisultanin mubeenin

Translation: १९. आणि तुम्ही अल्लाहसमोर विद्रोह दाखवू नका. मी तुमच्यासमोर उघड पुरावा प्रस्तुत करेन.

44:20

وَإِنِّي عُذۡتُ بِرَبِّي وَرَبِّكُمۡ أَن تَرۡجُمُونِ ﴿20﴾

Transliteration: Wainnee AAuthtu birabbee warabbikum an tarjumooni

Translation: २०. आणि मी, आपल्या व तुमच्या पालनकर्त्याच्या शरणात येतो. या गोष्टीपासून की तुम्ही मला दगडांनी ठेचून मारावे.

44:21

وَإِن لَّمۡ تُؤۡمِنُواْ لِي فَٱعۡتَزِلُونِ ﴿21﴾

Transliteration: Wain lam tuminoo lee faiAAtazilooni

Translation: २१. आणि जर तुम्ही माझ्यावर ईमान राखत नसाल तर माझ्यापासून अलग राहा.

44:22

فَدَعَا رَبَّهُۥٓ أَنَّ هَـٰٓؤُلَآءِ قَوۡمٞ مُّجۡرِمُونَ ﴿22﴾

Transliteration: FadaAAa rabbahu anna haolai qawmun mujrimoona

Translation: २२. मग त्यांनी आपल्या पालनकर्त्याला दुआ-प्रार्थना केली की हे सर्व अपराधी लोक आहेत.

44:23

فَأَسۡرِ بِعِبَادِي لَيۡلًا إِنَّكُم مُّتَّبَعُونَ ﴿23﴾

Transliteration: Faasri biAAibadee laylan innakum muttabaAAoona

Translation: २३. (आम्ही फर्माविले) की रात्रीतूनच तुम्ही माझ्या दासांना घेऊन निघा. निश्चितच तुमचा पाठलाग केला जाईल.

44:24

وَٱتۡرُكِ ٱلۡبَحۡرَ رَهۡوًاۖ إِنَّهُمۡ جُندٞ مُّغۡرَقُونَ ﴿24﴾

Transliteration: Waotruki albahra rahwan innahum jundun mughraqoona

Translation: २४. आणि तुम्ही समुद्राला स्थिर अवस्थेत सोडून निघून जा. निःसंशय, हे सैन्य बुडविले जाईल.

44:25

كَمۡ تَرَكُواْ مِن جَنَّـٰتٖ وَعُيُونٖ ﴿25﴾

Transliteration: Kam tarakoo min jannatin waAAuyoonin

Translation: २५. ते अनेक बागा आणि झरे सोडून गेले.

44:26

وَزُرُوعٖ وَمَقَامٖ كَرِيمٖ ﴿26﴾

Transliteration: WazurooAAin wamaqamin kareemin

Translation: २६. आणि शेते व उत्तम निवासस्थाने.

44:27

وَنَعۡمَةٖ كَانُواْ فِيهَا فَٰكِهِينَ ﴿27﴾

Transliteration: WanaAAmatin kanoo feeha fakiheena

Translation: २७. आणि त्या सुखदायक वस्तू ज्यांच्यात ते सुख भोगत होते.

44:28

كَذَٰلِكَۖ وَأَوۡرَثۡنَٰهَا قَوۡمًا ءَاخَرِينَ ﴿28﴾

Transliteration: Kathalika waawrathnaha qawman akhareena

Translation: २८. अशा प्रकारे घडले, आणि आम्ही त्या सर्वांचा उत्तराधिकारी (वारस) दुसऱ्या जनसमूहाला बनविले.

44:29

فَمَا بَكَتۡ عَلَيۡهِمُ ٱلسَّمَآءُ وَٱلۡأَرۡضُ وَمَا كَانُواْ مُنظَرِينَ ﴿29﴾

Transliteration: Fama bakat AAalayhimu alssamao waalardu wama kanoo munthareena

Translation: २९. तेव्हा त्यांच्यासाठी ना आकाश रडले ना धरती आणि ना त्यांना कसली संधी लाभली.

44:30

وَلَقَدۡ نَجَّيۡنَا بَنِيٓ إِسۡرَـٰٓءِيلَ مِنَ ٱلۡعَذَابِ ٱلۡمُهِينِ ﴿30﴾

Transliteration: Walaqad najjayna banee israeela mina alAAathabi almuheeni

Translation: ३०. आणि आम्हीच इस्राईलच्या संततीला (अतिशय) अपमानदायक शिक्षा-यातनेपासून मुक्ती दिली.

44:31

مِن فِرۡعَوۡنَۚ إِنَّهُۥ كَانَ عَالِيٗا مِّنَ ٱلۡمُسۡرِفِينَ ﴿31﴾

Transliteration: Min firAAawna innahu kana AAaliyan mina almusrifeena

Translation: ३१. (जी) फिरऔनतर्फे (दिली जात) होती. वास्तविक तो विद्रोही आणि मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांपैकी होता.

44:32

وَلَقَدِ ٱخۡتَرۡنَٰهُمۡ عَلَىٰ عِلۡمٍ عَلَى ٱلۡعَٰلَمِينَ ﴿32﴾

Transliteration: Walaqadi ikhtarnahum AAala AAilmin AAala alAAalameena

Translation: ३२. आणि आम्ही जाणूनबुजून इस्राईलच्या संततीला जगातील लोकांवर श्रेष्ठता प्रदान केली.

44:33

وَءَاتَيۡنَٰهُم مِّنَ ٱلۡأٓيَٰتِ مَا فِيهِ بَلَـٰٓؤٞاْ مُّبِينٌ ﴿33﴾

Transliteration: Waataynahum mina alayati ma feehi balaon mubeenun

Translation: ३३. आणि आम्ही त्यांना अशा निशाण्या प्रदान केल्या, ज्यांच्यात उघड कसोटी होती.

44:34

إِنَّ هَـٰٓؤُلَآءِ لَيَقُولُونَ ﴿34﴾

Transliteration: Inna haolai layaqooloona

Translation: ३४. हे लोक तर हेच म्हणतात.

44:35

إِنۡ هِيَ إِلَّا مَوۡتَتُنَا ٱلۡأُولَىٰ وَمَا نَحۡنُ بِمُنشَرِينَ ﴿35﴾

Transliteration: In hiya illa mawtatuna aloola wama nahnu bimunshareena

Translation: ३५. की (अंतिम गोष्ट) हेच आमचे पहिल्यांदा (जगात) मरण पावणे आहे आणि आम्ही दुसऱ्यांदा उठविलो जाणार नाहीत.

44:36

فَأۡتُواْ بِـَٔابَآئِنَآ إِن كُنتُمۡ صَٰدِقِينَ ﴿36﴾

Transliteration: Fatoo biabaina in kuntum sadiqeena

Translation: ३६. जर तुम्ही सच्चे असाल तर आमच्या पूर्वजांना घेऊन या.

44:37

أَهُمۡ خَيۡرٌ أَمۡ قَوۡمُ تُبَّعٖ وَٱلَّذِينَ مِن قَبۡلِهِمۡ أَهۡلَكۡنَٰهُمۡۚ إِنَّهُمۡ كَانُواْ مُجۡرِمِينَ ﴿37﴾

Transliteration: Ahum khayrun am qawmu tubbaAAin waallatheena min qablihim ahlaknahum innahum kanoo mujrimeena

Translation: ३७. काय हे लोक अधिक चांगले आहेत की तुब्बअ च्या जनसमूहाचे लोक आणि जे त्यांच्याही पूर्वीचे होते? आम्ही त्या सर्वांना नष्ट करून टाकले. निःसंशय, ते अपराधी होते.

44:38

وَمَا خَلَقۡنَا ٱلسَّمَٰوَٰتِ وَٱلۡأَرۡضَ وَمَا بَيۡنَهُمَا لَٰعِبِينَ ﴿38﴾

Transliteration: Wama khalaqna alssamawati waalarda wama baynahuma laAAibeena

Translation: ३८. आणि आम्ही आकाशांना व धरतीला आणि त्यांच्या दरम्यानच्या वस्तूंना खेळ स्वरूपात निर्माण केले नाही.

44:39

مَا خَلَقۡنَٰهُمَآ إِلَّا بِٱلۡحَقِّ وَلَٰكِنَّ أَكۡثَرَهُمۡ لَا يَعۡلَمُونَ ﴿39﴾

Transliteration: Ma khalaqnahuma illa bialhaqqi walakinna aktharahum la yaAAlamoona

Translation: ३९. किंबहुना आम्ही त्यांना उचित हेतुसहच निर्माण केले आहे. परंतु अधिकांश लोक हे जाणत नाहीत.

44:40

إِنَّ يَوۡمَ ٱلۡفَصۡلِ مِيقَٰتُهُمۡ أَجۡمَعِينَ ﴿40﴾

Transliteration: Inna yawma alfasli meeqatuhum ajmaAAeena

Translation: ४०. निःसंशय, निर्णयाचा दिवस त्या सर्वांसाठी निर्धारित वेळी आहे.

44:41

يَوۡمَ لَا يُغۡنِي مَوۡلًى عَن مَّوۡلٗى شَيۡـٔٗا وَلَا هُمۡ يُنصَرُونَ ﴿41﴾

Transliteration: Yawma la yughnee mawlan AAan mawlan shayan wala hum yunsaroona

Translation: ४१. त्या दिवशी कोणी मित्र कोणा मित्राच्या काहीच कामी येणार नाही आणि ना त्यांची मदत केली जाईल.

44:42

إِلَّا مَن رَّحِمَ ٱللَّهُۚ إِنَّهُۥ هُوَ ٱلۡعَزِيزُ ٱلرَّحِيمُ ﴿42﴾

Transliteration: Illa man rahima Allahu innahu huwa alAAazeezu alrraheemu

Translation: ४२. परंतु (त्याच्याखेरीज) ज्याच्यावर अल्लाहची दया - कृपा व्हावी. निःसंशय, तो मोठा शक्तिशाली आणि दया करणारा आहे.

44:43

إِنَّ شَجَرَتَ ٱلزَّقُّومِ ﴿43﴾

Transliteration: Inna shajarata alzzaqqoomi

Translation: ४३. निःसंशय, जक्कूमचे झाड

44:44

طَعَامُ ٱلۡأَثِيمِ ﴿44﴾

Transliteration: TaAAamu alatheemi

Translation: ४४. गुन्हेगारांचे भोजन आहे

44:45

كَٱلۡمُهۡلِ يَغۡلِي فِي ٱلۡبُطُونِ ﴿45﴾

Transliteration: Kaalmuhli yaghlee fee albutooni

Translation: ४५. जे वितळलेल्या तांब्यासारखे आहे आणि पोटात उकळत राहते.

44:46

كَغَلۡيِ ٱلۡحَمِيمِ ﴿46﴾

Transliteration: Kaghalyi alhameemi

Translation: ४६. खूप गरम उकळत्या पाण्यासारखे.

44:47

خُذُوهُ فَٱعۡتِلُوهُ إِلَىٰ سَوَآءِ ٱلۡجَحِيمِ ﴿47﴾

Transliteration: Khuthoohu faiAAtiloohu ila sawai aljaheemi

Translation: ४७. त्याला धरा, मग फरफटत ओढत नेऊन जहन्नमच्या मध्यभागी पोहचवा,

44:48

ثُمَّ صُبُّواْ فَوۡقَ رَأۡسِهِۦ مِنۡ عَذَابِ ٱلۡحَمِيمِ ﴿48﴾

Transliteration: Thumma subboo fawqa rasihi min AAathabi alhameemi

Translation: ४८. मग त्याच्या डोक्यावर गरम उकळत्या पाण्याची यातना (अज़ाब) ओता.

44:49

ذُقۡ إِنَّكَ أَنتَ ٱلۡعَزِيزُ ٱلۡكَرِيمُ ﴿49﴾

Transliteration: Thuq innaka anta alAAazeezu alkareemu

Translation: ४९. (त्याला सांगितले जाईल) चाखत जा (गोडी), तू तर मोठा प्रतिष्ठित आणि आदरसन्मान बाळगणारा होता.

44:50

إِنَّ هَٰذَا مَا كُنتُم بِهِۦ تَمۡتَرُونَ ﴿50﴾

Transliteration: Inna hatha ma kuntum bihi tamtaroona

Translation: ५०. हीच ती गोष्ट होय, जिच्याबाबत तुम्ही शंका करीत असत.

44:51

إِنَّ ٱلۡمُتَّقِينَ فِي مَقَامٍ أَمِينٖ ﴿51﴾

Transliteration: Inna almuttaqeena fee maqamin ameenin

Translation: ५१. निःसंशय, अल्लाहचे भय बाळगणारे शांतीपूर्ण ठिकाणी असतील

44:52

فِي جَنَّـٰتٖ وَعُيُونٖ ﴿52﴾

Transliteration: Fee jannatin waAAuyoonin

Translation: ५२. बागांमध्ये आणि जलस्रोतां (झऱ्यां) मध्ये.

44:53

يَلۡبَسُونَ مِن سُندُسٖ وَإِسۡتَبۡرَقٖ مُّتَقَٰبِلِينَ ﴿53﴾

Transliteration: Yalbasoona min sundusin waistabraqin mutaqabileena

Translation: ५३. पातळ व मुलायम रेशमी वस्त्रे घातलेले, समोरासमोर बसले असतील.

44:54

كَذَٰلِكَ وَزَوَّجۡنَٰهُم بِحُورٍ عِينٖ ﴿54﴾

Transliteration: Kathalika wazawwajnahum bihoorin AAeenin

Translation: ५४. हे त्याच प्रकारे आहे, आणि आम्ही मोठया नेत्रांच्या हूर-परींशी त्यांचा विवाह करून देऊ.

44:55

يَدۡعُونَ فِيهَا بِكُلِّ فَٰكِهَةٍ ءَامِنِينَ ﴿55﴾

Transliteration: YadAAoona feeha bikulli fakihatin amineena

Translation: ५५. निर्भयतापूर्वक तिथे प्रत्येक प्रकारच्या मेव्याची मागणी करतील.

44:56

لَا يَذُوقُونَ فِيهَا ٱلۡمَوۡتَ إِلَّا ٱلۡمَوۡتَةَ ٱلۡأُولَىٰۖ وَوَقَىٰهُمۡ عَذَابَ ٱلۡجَحِيمِ ﴿56﴾

Transliteration: La yathooqoona feeha almawta illa almawtata aloola wawaqahum AAathaba aljaheemi

Translation: ५६. तिथे ते मृत्युचा स्वाद चाखणार नाहीत, पहिल्या मृत्युखेरीज (जो जगात घडला) त्यांना अल्लाहने जहन्नमच्या (भयंकर) शिक्षा - यातने (अज़ाब) पासून वाचविले.

44:57

فَضۡلٗا مِّن رَّبِّكَۚ ذَٰلِكَ هُوَ ٱلۡفَوۡزُ ٱلۡعَظِيمُ ﴿57﴾

Transliteration: Fadlan min rabbika thalika huwa alfawzu alAAatheemu

Translation: ५७. ही केवळ तुमच्या पालनकर्त्याची कृपा आहे. हीच आहे मोठी सफलता.

44:58

فَإِنَّمَا يَسَّرۡنَٰهُ بِلِسَانِكَ لَعَلَّهُمۡ يَتَذَكَّرُونَ ﴿58﴾

Transliteration: Fainnama yassarnahu bilisanika laAAallahum yatathakkaroona

Translation: ५८. आम्ही या (कुरआना) ला तुमच्या भाषेत सोपे केले, यासाठी की त्यांनी (लोकांनी) बोध ग्रहण करावा.

44:59

فَٱرۡتَقِبۡ إِنَّهُم مُّرۡتَقِبُونَ ﴿59﴾

Transliteration: Fairtaqib innahum murtaqiboona

Translation: ५९. आता तुम्ही प्रतीक्षा करा, हे देखील प्रतीक्षा करीत आहेत.

Transliteration source: English Transliteration by Tanzil. Used under Tanzil's non-commercial terms; see the source and latest updates at Tanzil. Tanzil translation download