quranm◉

Surah Adh-Dhariyat transliteration

◉ सूरह · ∞

51:1

وَٱلذَّـٰرِيَٰتِ ذَرۡوٗا ﴿1﴾

Transliteration: Waalththariyati tharwan

Translation: १. शपथ आहे उडवून विखुरणाऱ्यां (वाऱ्यां) ची

51:2

فَٱلۡحَٰمِلَٰتِ وِقۡرٗا ﴿2﴾

Transliteration: Faalhamilati wiqran

Translation: २. मग ओझे उचलणाऱ्यांची

51:3

فَٱلۡجَٰرِيَٰتِ يُسۡرٗا ﴿3﴾

Transliteration: Faaljariyati yusran

Translation: ३. मग धीम्या गतीने चालणाऱ्यांची

51:4

فَٱلۡمُقَسِّمَٰتِ أَمۡرًا ﴿4﴾

Transliteration: Faalmuqassimati amran

Translation: ४. मग कामाची वाटणी करणाऱ्यांची.

51:5

إِنَّمَا تُوعَدُونَ لَصَادِقٞ ﴿5﴾

Transliteration: Innama tooAAadoona lasadiqun

Translation: ५. निःसंशय, तुम्हाला जे वायदे दिले जातात (ते सर्व) खरे आहेत.

51:6

وَإِنَّ ٱلدِّينَ لَوَٰقِعٞ ﴿6﴾

Transliteration: Wainna alddeena lawaqiAAun

Translation: ६. आणि निश्चितच न्याय होणार आहे.

51:7

وَٱلسَّمَآءِ ذَاتِ ٱلۡحُبُكِ ﴿7﴾

Transliteration: Waalssamai thati alhubuki

Translation: ७. शपथ आहे, मार्ग राखणाऱ्या आकाशाची.

51:8

إِنَّكُمۡ لَفِي قَوۡلٖ مُّخۡتَلِفٖ ﴿8﴾

Transliteration: Innakum lafee qawlin mukhtalifin

Translation: ८. निश्चितच तुम्ही विभिन्न गोष्टीत पडला आहात.

51:9

يُؤۡفَكُ عَنۡهُ مَنۡ أُفِكَ ﴿9﴾

Transliteration: Yufaku AAanhu man ofika

Translation: ९. त्या (सत्या) पासून तोच फिरविला जातो, जो फिरविला गेला असावा.

51:10

قُتِلَ ٱلۡخَرَّـٰصُونَ ﴿10﴾

Transliteration: Qutila alkharrasoona

Translation: १०. अटकळीच्या गोष्टी बोलणारे नष्ट केले गेले.

51:11

ٱلَّذِينَ هُمۡ فِي غَمۡرَةٖ سَاهُونَ ﴿11﴾

Transliteration: Allatheena hum fee ghamratin sahoona

Translation: ११. जे चेतनाहीन आहेत आणि विसर पडलेले.

51:12

يَسۡـَٔلُونَ أَيَّانَ يَوۡمُ ٱلدِّينِ ﴿12﴾

Transliteration: Yasaloona ayyana yawmu alddeeni

Translation: १२. विचारतात की मोबदल्याचा दिवस केव्हा येईल?

51:13

يَوۡمَ هُمۡ عَلَى ٱلنَّارِ يُفۡتَنُونَ ﴿13﴾

Transliteration: Yawma hum AAala alnnari yuftanoona

Translation: १३. (होय) हा तो दिवस आहे की हे आगीवर तापविले जातील.

51:14

ذُوقُواْ فِتۡنَتَكُمۡ هَٰذَا ٱلَّذِي كُنتُم بِهِۦ تَسۡتَعۡجِلُونَ ﴿14﴾

Transliteration: Thooqoo fitnatakum hatha allathee kuntum bihi tastaAAjiloona

Translation: १४. स्वाद चाखा. हेच ते, ज्याची तुम्ही घाई माजवित होते.

51:15

إِنَّ ٱلۡمُتَّقِينَ فِي جَنَّـٰتٖ وَعُيُونٍ ﴿15﴾

Transliteration: Inna almuttaqeena fee jannatin waAAuyoonin

Translation: १५. निःसंशय, अल्लाहचे भय बाळगणारे जन्नतींमध्ये आणि (शीतल) झऱ्यांमध्ये असतील.

51:16

ءَاخِذِينَ مَآ ءَاتَىٰهُمۡ رَبُّهُمۡۚ إِنَّهُمۡ كَانُواْ قَبۡلَ ذَٰلِكَ مُحۡسِنِينَ ﴿16﴾

Transliteration: Akhitheena ma atahum rabbuhum innahum kanoo qabla thalika muhsineena

Translation: १६. त्यांच्या पालनकर्त्याने जे काही त्यांना प्रदान केले आहे, ते घेत असतील ते तर त्यापूर्वीच सत्कर्म करणारे होते.

51:17

كَانُواْ قَلِيلٗا مِّنَ ٱلَّيۡلِ مَا يَهۡجَعُونَ ﴿17﴾

Transliteration: Kanoo qaleelan mina allayli ma yahjaAAoona

Translation: १७. ते रात्री फार कमी झोपत असत.

51:18

وَبِٱلۡأَسۡحَارِ هُمۡ يَسۡتَغۡفِرُونَ ﴿18﴾

Transliteration: Wabialashari hum yastaghfiroona

Translation: १८. आणि ते रात्रीच्या अंतिम प्रहरी (पहाटे) क्षमा - याचना करीत.

51:19

وَفِيٓ أَمۡوَٰلِهِمۡ حَقّٞ لِّلسَّآئِلِ وَٱلۡمَحۡرُومِ ﴿19﴾

Transliteration: Wafee amwalihim haqqun lilssaili waalmahroomi

Translation: १९. आणि त्यांच्या धन-संपत्तीत याचकांचा(मागणाऱ्यांचा)आणि याचना करण्यापासून अलिप्त राहणाऱ्यांचा हक्क होता.

51:20

وَفِي ٱلۡأَرۡضِ ءَايَٰتٞ لِّلۡمُوقِنِينَ ﴿20﴾

Transliteration: Wafee alardi ayatun lilmooqineena

Translation: २०. आणि विश्वास राखणाऱ्यांकरिता तर धरतीत अनेक निशाण्या आहेत.

51:21

وَفِيٓ أَنفُسِكُمۡۚ أَفَلَا تُبۡصِرُونَ ﴿21﴾

Transliteration: Wafee anfusikum afala tubsiroona

Translation: २१. आणि स्वतः तुमच्या अस्तित्वात देखील, तर काय तुम्ही पाहत नाहीत?

51:22

وَفِي ٱلسَّمَآءِ رِزۡقُكُمۡ وَمَا تُوعَدُونَ ﴿22﴾

Transliteration: Wafee alssamai rizqukum wama tooAAadoona

Translation: २२. आणि तुमची आजिविका(अन्न सामुग्री) आणि जो तुम्हाला वायदा दिला जात आहे, सर्व आकाशात आहे.

51:23

فَوَرَبِّ ٱلسَّمَآءِ وَٱلۡأَرۡضِ إِنَّهُۥ لَحَقّٞ مِّثۡلَ مَآ أَنَّكُمۡ تَنطِقُونَ ﴿23﴾

Transliteration: Fawarabbi alssamai waalardi innahu lahaqqun mithla ma annakum tantiqoona

Translation: २३. तेव्हा आकाश आणि धरतीच्या स्वामी व पालनकर्त्याची शपथ! हे अगदी सत्य आहे, असेच खात्रीपूर्वक, जसे तुम्ही बोलता.

51:24

هَلۡ أَتَىٰكَ حَدِيثُ ضَيۡفِ إِبۡرَٰهِيمَ ٱلۡمُكۡرَمِينَ ﴿24﴾

Transliteration: Hal ataka hadeethu dayfi ibraheema almukrameena

Translation: २४. काय तुम्हाला इब्राहीम (अलैहिस्सलाम) च्या सन्मानित अतिथींची वार्ताही पोहचली आहे?

51:25

إِذۡ دَخَلُواْ عَلَيۡهِ فَقَالُواْ سَلَٰمٗاۖ قَالَ سَلَٰمٞ قَوۡمٞ مُّنكَرُونَ ﴿25﴾

Transliteration: Ith dakhaloo AAalayhi faqaloo salaman qala salamun qawmun munkaroona

Translation: २५. ते जेव्हा त्यांच्याजवळ आले तेव्हा सलाम केला. (इब्राहीम) यांनी सलामला उत्तर दिले (आणि म्हणाले, हे तर) अनोळखी लोक आहेत.

51:26

فَرَاغَ إِلَىٰٓ أَهۡلِهِۦ فَجَآءَ بِعِجۡلٖ سَمِينٖ ﴿26﴾

Transliteration: Faragha ila ahlihi fajaa biAAijlin sameenin

Translation: २६. मग (गुपचुप घाईघाईने) आपल्या कुटुंबियांकडे गेले आणि एका लठ्ठ वासरुचे (मांस) घेऊन आले.

51:27

فَقَرَّبَهُۥٓ إِلَيۡهِمۡ قَالَ أَلَا تَأۡكُلُونَ ﴿27﴾

Transliteration: Faqarrabahu ilayhim qala ala takuloona

Translation: २७. आणि ते त्यांच्या पुढे ठेवले आणि म्हणाले, तुम्ही खात का नाही?

51:28

فَأَوۡجَسَ مِنۡهُمۡ خِيفَةٗۖ قَالُواْ لَا تَخَفۡۖ وَبَشَّرُوهُ بِغُلَٰمٍ عَلِيمٖ ﴿28﴾

Transliteration: Faawjasa minhum kheefatan qaloo la takhaf wabashsharoohu bighulamin AAaleemin

Translation: २८. मग मनातल्या मनात त्यांच्यापासून भयभित झाले. (अतिथी) म्हणाले, तुम्ही भिऊ नका आणि त्यांना (हजरत) इब्राहीमला एका ज्ञानी पुत्रप्राप्तीची शुभवार्ता दिली.

51:29

فَأَقۡبَلَتِ ٱمۡرَأَتُهُۥ فِي صَرَّةٖ فَصَكَّتۡ وَجۡهَهَا وَقَالَتۡ عَجُوزٌ عَقِيمٞ ﴿29﴾

Transliteration: Faaqbalati imraatuhu fee sarratin fasakkat wajhaha waqalat AAajoozun AAaqeemun

Translation: २९. तेव्हा त्यांच्या पत्नीने आश्चर्यचकित होऊन आपल्या तोंडावर हात मारून म्हटले की मी तर म्हातारी आहे, त्याचबरोबर वांझ देखील.

51:30

قَالُواْ كَذَٰلِكِ قَالَ رَبُّكِۖ إِنَّهُۥ هُوَ ٱلۡحَكِيمُ ٱلۡعَلِيمُ ﴿30﴾

Transliteration: Qaloo kathaliki qala rabbuki innahu huwa alhakeemu alAAaleemu

Translation: ३०. ते म्हणाले की होय, तुमच्या पालनकर्त्या (अल्लाह) ने असेच फर्माविले आहे. निःसंशय, तो हिकमशाली आणि जाणणारा आहे.

51:31

قَالَ فَمَا خَطۡبُكُمۡ أَيُّهَا ٱلۡمُرۡسَلُونَ ﴿31﴾

Transliteration: Qala fama khatbukum ayyuha almursaloona

Translation: ३१. (हजरत इब्राहीम अलै.) म्हणाले की अल्लाहने पाठविलेल्या (फरिश्त्यां) नो! तुमच्या (येण्याचा) हेतू काय?

51:32

قَالُوٓاْ إِنَّآ أُرۡسِلۡنَآ إِلَىٰ قَوۡمٖ مُّجۡرِمِينَ ﴿32﴾

Transliteration: Qaloo inna orsilna ila qawmin mujrimeena

Translation: ३२. त्यांनी उत्तर दिले की आम्ही अपराधी लोकांकडे पाठविले गेलो आहोत.

51:33

لِنُرۡسِلَ عَلَيۡهِمۡ حِجَارَةٗ مِّن طِينٖ ﴿33﴾

Transliteration: Linursila AAalayhim hijaratan min teenin

Translation: ३३. यासाठी की आम्ही त्याच्यावर (भाजलेल्या) मातीच्या दगडांचा वर्षाव करावा.

51:34

مُّسَوَّمَةً عِندَ رَبِّكَ لِلۡمُسۡرِفِينَ ﴿34﴾

Transliteration: Musawwamatan AAinda rabbika lilmusrifeena

Translation: ३४. जे तुमच्या पालनकर्त्यातर्फे चिन्हांकित झाले आहेत त्या मर्यादा भंग करणाऱ्यांकरिता.

51:35

فَأَخۡرَجۡنَا مَن كَانَ فِيهَا مِنَ ٱلۡمُؤۡمِنِينَ ﴿35﴾

Transliteration: Faakhrajna man kana feeha mina almumineena

Translation: ३५. तेव्हा जेवढे ईमान राखणारे तिथे होते, आम्ही त्यांना तेथून काढले.

51:36

فَمَا وَجَدۡنَا فِيهَا غَيۡرَ بَيۡتٖ مِّنَ ٱلۡمُسۡلِمِينَ ﴿36﴾

Transliteration: Fama wajadna feeha ghayra baytin mina almuslimeena

Translation: ३६. आणि आम्हाला तिथे मुसलमानांचे फक्त एकच घर आढळले.

51:37

وَتَرَكۡنَا فِيهَآ ءَايَةٗ لِّلَّذِينَ يَخَافُونَ ٱلۡعَذَابَ ٱلۡأَلِيمَ ﴿37﴾

Transliteration: Watarakna feeha ayatan lillatheena yakhafoona alAAathaba alaleema

Translation: ३७. आणि आम्ही तिथे त्यांच्यासाठी, जे दुःखदायक शिक्षा यातनेचे भय बाळगतात, एक पूर्ण चिन्ह सोडले.

51:38

وَفِي مُوسَىٰٓ إِذۡ أَرۡسَلۡنَٰهُ إِلَىٰ فِرۡعَوۡنَ بِسُلۡطَٰنٖ مُّبِينٖ ﴿38﴾

Transliteration: Wafee moosa ith arsalnahu ila firAAawna bisultanin mubeenin

Translation: ३८. आणि मूसाच्या वृत्तांतात (ही आमच्यातर्फे तंबी आहे) जेव्हा आम्ही त्यांना फिरऔनकडे स्पष्ट प्रमाणासह पाठविले.

51:39

فَتَوَلَّىٰ بِرُكۡنِهِۦ وَقَالَ سَٰحِرٌ أَوۡ مَجۡنُونٞ ﴿39﴾

Transliteration: Fatawalla biruknihi waqala sahirun aw majnoonun

Translation: ३९. तेव्हा त्याने आपल्या सामर्थ्याच्या घमेंडीत तोंड फिरविले, आणि म्हणाले, हा (एकतर) जादूगार आहे किंवा वेडसर आहे.

51:40

فَأَخَذۡنَٰهُ وَجُنُودَهُۥ فَنَبَذۡنَٰهُمۡ فِي ٱلۡيَمِّ وَهُوَ مُلِيمٞ ﴿40﴾

Transliteration: Faakhathnahu wajunoodahu fanabathnahum fee alyammi wahuwa muleemun

Translation: ४०. शेवटी आम्ही त्याला आणि त्याच्या सैन्याला आपल्या शिक्षा-यातनेत धरून, समुद्रात टाकले. तो होताच निर्भर्त्सना करण्यायोग्य.

51:41

وَفِي عَادٍ إِذۡ أَرۡسَلۡنَا عَلَيۡهِمُ ٱلرِّيحَ ٱلۡعَقِيمَ ﴿41﴾

Transliteration: Wafee AAadin ith arsalna AAalayhimu alrreeha alAAaqeema

Translation: ४१. त्याचप्रमाणे आदच्या लोकांमध्येही (आमच्यातर्फे तंबी आहे) जेव्हा आम्ही त्यांच्यावर वांझ (अशुभ) वादळ पाठविले.

51:42

مَا تَذَرُ مِن شَيۡءٍ أَتَتۡ عَلَيۡهِ إِلَّا جَعَلَتۡهُ كَٱلرَّمِيمِ ﴿42﴾

Transliteration: Ma tatharu min shayin atat AAalayhi illa jaAAalathu kaalrrameemi

Translation: ४२. ते ज्या ज्या वस्तूवरून गेले, तिला जीर्ण हाडांप्रमाणे चूरेचूर करून टाकले.

51:43

وَفِي ثَمُودَ إِذۡ قِيلَ لَهُمۡ تَمَتَّعُواْ حَتَّىٰ حِينٖ ﴿43﴾

Transliteration: Wafee thamooda ith qeela lahum tamattaAAoo hatta heenin

Translation: ४३. आणि समूद (च्या वृत्तांता) मध्येही (बोध) आहे, जेव्हा त्यांना सांगितले गेले की तुम्ही काही दिवसापर्यंत लाभ प्राप्त करून घ्या.

51:44

فَعَتَوۡاْ عَنۡ أَمۡرِ رَبِّهِمۡ فَأَخَذَتۡهُمُ ٱلصَّـٰعِقَةُ وَهُمۡ يَنظُرُونَ ﴿44﴾

Transliteration: FaAAataw AAan amri rabbihim faakhathathumu alssaAAiqatu wahum yanthuroona

Translation: ४४. परंतु त्यांनी आपल्या पालनकर्त्याच्या आदेशाचे पालन केले नाही, ज्याबद्दल त्यांना एका भयंकर गर्जनेने नष्ट करून टाकले आणि ते बघतच राहिले.

51:45

فَمَا ٱسۡتَطَٰعُواْ مِن قِيَامٖ وَمَا كَانُواْ مُنتَصِرِينَ ﴿45﴾

Transliteration: Fama istataAAoo min qiyamin wama kanoo muntasireena

Translation: ४५. मग ना तर ते उभे राहू शकले, आणि ना सूड घेऊ शकले.

51:46

وَقَوۡمَ نُوحٖ مِّن قَبۡلُۖ إِنَّهُمۡ كَانُواْ قَوۡمٗا فَٰسِقِينَ ﴿46﴾

Transliteration: Waqawma noohin min qablu innahum kanoo qawman fasiqeena

Translation: ४६. आणि नूह (अलै.) यांच्या जनसमूहाची देखील याच्या आधी (हीच अवस्था झाली होती) ते देखील मोठे अवज्ञाकारी लोक होते.

51:47

وَٱلسَّمَآءَ بَنَيۡنَٰهَا بِأَيۡيْدٖ وَإِنَّا لَمُوسِعُونَ ﴿47﴾

Transliteration: Waalssamaa banaynaha biaydin wainna lamoosiAAoona

Translation: ४७. आणि आकाशाला आम्ही (आपल्या) हातांनी बनविले आहे आणि निःसंशय, आम्ही व्यापक करणारे आहोत.

51:48

وَٱلۡأَرۡضَ فَرَشۡنَٰهَا فَنِعۡمَ ٱلۡمَٰهِدُونَ ﴿48﴾

Transliteration: Waalarda farashnaha faniAAma almahidoona

Translation: ४८. आणि जमिनीला आम्ही बिछाईत बनविले आहे, तेव्हा आम्ही किती चांगले बिछाईत करणारे आहोत.

51:49

وَمِن كُلِّ شَيۡءٍ خَلَقۡنَا زَوۡجَيۡنِ لَعَلَّكُمۡ تَذَكَّرُونَ ﴿49﴾

Transliteration: Wamin kulli shayin khalaqna zawjayni laAAallakum tathakkaroona

Translation: ४९. आणि प्रत्येक वस्तूला आम्ही जोडी जोडीने निर्माण केले आहे,१ यासाठी की तुम्ही बोध ग्रहण करावा.

51:50

فَفِرُّوٓاْ إِلَى ٱللَّهِۖ إِنِّي لَكُم مِّنۡهُ نَذِيرٞ مُّبِينٞ ﴿50﴾

Transliteration: Fafirroo ila Allahi innee lakum minhu natheerun mubeenun

Translation: ५०. तेव्हा तुम्ही अल्लाहकडे धाव घ्या. निःसंशय, मी तुम्हाला त्याच्यातर्फे खबरदार करणारा आहे.

51:51

وَلَا تَجۡعَلُواْ مَعَ ٱللَّهِ إِلَٰهًا ءَاخَرَۖ إِنِّي لَكُم مِّنۡهُ نَذِيرٞ مُّبِينٞ ﴿51﴾

Transliteration: Wala tajAAaloo maAAa Allahi ilahan akhara innee lakum minhu natheerun mubeenun

Translation: ५१. आणि अल्लाहसोबत दुसऱ्या कोणालाही उपास्य (दैवत) बनवू नका, निश्चितच, मी तुम्हाला त्याच्यातर्फे स्पष्टतः सावध करणारा आहे.

51:52

كَذَٰلِكَ مَآ أَتَى ٱلَّذِينَ مِن قَبۡلِهِم مِّن رَّسُولٍ إِلَّا قَالُواْ سَاحِرٌ أَوۡ مَجۡنُونٌ ﴿52﴾

Transliteration: Kathalika ma ata allatheena min qablihim min rasoolin illa qaloo sahirun aw majnoonun

Translation: ५२. अशाच प्रकारे जे लोक त्यांच्या पूर्वी होऊन गेलेत, त्यांच्याजवळ जो देखील पैगंबर आला, त्याला ते म्हणाले की एकतर हा जादूगार आहे किंवा वेडा!

51:53

أَتَوَاصَوۡاْ بِهِۦۚ بَلۡ هُمۡ قَوۡمٞ طَاغُونَ ﴿53﴾

Transliteration: Atawasaw bihi bal hum qawmun taghoona

Translation: ५३. काय हे, या गोष्टीची एकमेकांना ताकीद करत गेलेत, नव्हे, किंबहुना हे सर्व विद्रोही (उन्मत्त) लोक आहेत.

51:54

فَتَوَلَّ عَنۡهُمۡ فَمَآ أَنتَ بِمَلُومٖ ﴿54﴾

Transliteration: Fatawalla AAanhum fama anta bimaloomin

Translation: ५४. तेव्हा तुम्ही त्यांच्याकडून तोंड फिरवून घ्या, तुमच्यावर कसलाही दोषारोप नाही.

51:55

وَذَكِّرۡ فَإِنَّ ٱلذِّكۡرَىٰ تَنفَعُ ٱلۡمُؤۡمِنِينَ ﴿55﴾

Transliteration: Wathakkir fainna alththikra tanfaAAu almumineena

Translation: ५५. आणि उपदेश करीत राहा, निःसंशय हा उपदेश ईमान राखणाऱ्यांना लाभ देईल.

51:56

وَمَا خَلَقۡتُ ٱلۡجِنَّ وَٱلۡإِنسَ إِلَّا لِيَعۡبُدُونِ ﴿56﴾

Transliteration: Wama khalaqtu aljinna waalinsa illa liyaAAbudooni

Translation: ५६. मी जिन्नांना आणि मानवांना फक्त अशासाठी निर्माण केले आहे की त्यांनी केवळ माझी उपासना करावी.१

51:57

مَآ أُرِيدُ مِنۡهُم مِّن رِّزۡقٖ وَمَآ أُرِيدُ أَن يُطۡعِمُونِ ﴿57﴾

Transliteration: Ma oreedu minhum min rizqin wama oreedu an yutAAimooni

Translation: ५७. त्यांच्याकडून मी ना आजिविका (रोजी) इच्छितो ना असे इच्छितो की त्यांनी मला खाऊ घालावे.

51:58

إِنَّ ٱللَّهَ هُوَ ٱلرَّزَّاقُ ذُو ٱلۡقُوَّةِ ٱلۡمَتِينُ ﴿58﴾

Transliteration: Inna Allaha huwa alrrazzaqu thoo alquwwati almateenu

Translation: ५८. निःसंशय, अल्लाह स्वतः रोजी देणारा सामर्थ्यशाली व बलवान आहे.

51:59

فَإِنَّ لِلَّذِينَ ظَلَمُواْ ذَنُوبٗا مِّثۡلَ ذَنُوبِ أَصۡحَٰبِهِمۡ فَلَا يَسۡتَعۡجِلُونِ ﴿59﴾

Transliteration: Fainna lillatheena thalamoo thanooban mithla thanoobi ashabihim fala yastaAAjiloona

Translation: ५९. तेव्हा ज्या लोकांनी अत्याचार केला आहे, त्यांनाही त्यांच्या साथीदारांच्या हिश्श्याइतकाच हिस्सा मिळेल, यास्तव त्यांनी माझ्याशी घाईने मागू नये.

51:60

فَوَيۡلٞ لِّلَّذِينَ كَفَرُواْ مِن يَوۡمِهِمُ ٱلَّذِي يُوعَدُونَ ﴿60﴾

Transliteration: Fawaylun lillatheena kafaroo min yawmihimu allathee yooAAadoona

Translation: ६०. तेव्हा दुर्दशा आहे काफिरांसाठी, त्यांच्या त्या दिवशी ज्याचा त्यांना वायदा दिला जात आहे.

Transliteration source: English Transliteration by Tanzil. Used under Tanzil's non-commercial terms; see the source and latest updates at Tanzil. Tanzil translation download